आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:घृष्णेश्वर मंदिराच्या ताब्यासंबंधी दावा करणारा पुजारी वास्तूच्या संवर्धनासाठी खर्च करतो का?

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून खंडपीठात प्रश्न उपस्थित, तीन आठवड्यांनी सुनावणी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वरच्या १३ एकर दोन गुंठे मालमत्तेवर दावा सांगणारा पुजारी मंदिराचे संवर्धन आणि संरक्षणासाठी किती रक्कम खर्च करतो, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे उपस्थित करण्यात आला. मागील ६१ वर्षांपूर्वीच गॅझेट नोटिफिकेशन झाले, त्यात संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे गॅझेट की सातबाऱ्याला महत्त्व द्यायचे, अशी विचारणा सुनावणीप्रसंगी करण्यात आली. न्या. मंगेश पाटील यांनी प्रतिवादी पुजाऱ्यास नोटीस बजावून सुनावणी तीन आठवड्यांनंतर ठेवली आहे.

घृष्णेश्वर मंदिर व मंदिराची सर्व्हे क्र. २९९ मधील १३ एकर २ गुंठे जमीन संवर्धन आणि संरक्षणासाठी केंद्र सरकारने पुरातत्त्व सर्वेक्षण विभागास २७ सप्टेंबर १९६० रोजी दिली. तेव्हापासून पुरातत्त्व विभाग वास्तूची देखभाल व सुरक्षा करीत आहे. मंदिराच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी तैनात केले. त्यांना पुरातत्त्व विभागामार्फत वेतन दिले जाते. खुलताबाद तहसीलदारांनी २०१० मध्ये पुरातत्त्व विभागाच्या सातबाऱ्यावर नाव घेतले. पुजारी रवींद्र प्रल्हादराव पुजारी यांचे इतर हक्कात नाव घेतले. संबंधित जमीन ही इनामी असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबीयांनी दान केलेली असून मालकी हक्कात आपले नाव घ्यावे यासाठी पुजारी पुराणिक यांनी न्यायालयात दावा दाखल केला. पुराणिक यांनी यासंबंधी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर औरंगाबाद येथे मालकी हक्कासाठी दावा दाखल केला असता त्यांचा दावा मंजूर करण्यात आला. यास जिल्हा न्यायालयानेही अपिलात मंजुरी प्रदान केली.

खालच्या दोन्ही न्यायालयांनी पुराणिक यांचा मंदिर आणि त्याच्या जागेवर ताबा असल्याचे मान्य केले. पुरातत्त्व विभागाच्या वतीने खंडपीठात अपील दाखल करण्यात आले. पुरातत्त्व विभागाच्या वतीने अॅड. रामदास भोसले यांनी खंडपीठात युक्तिवाद केला. न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी प्रतिवादी पुराणिक यास कोर्टामार्फत नोटीस बजावण्याचे आदेश दिले. खासगी नोटीसही बजावण्याचे आदेशित केले. सोमवारी (३ जानेवारी) याचिका सुनावणीस आली असता कोर्टामार्फत नोटीस बजावली नसल्याने न्या. मंगेश पाटील यांनी तीन आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली.

पुरावा न्यायालयात नाही
अॅड. भोसले यांनी स्वत:ला पुजारी म्हणवणाऱ्याकडे मंदिर व त्याच्या मालमत्तेचा ताबा कसा काय दिला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित केला. ताबा म्हणणारा प्रतिवादी मंदिराच्या संवर्धनासाठी व सुरक्षेसाठी काही रक्कम खर्च करतो काय? त्यामुळे तो मालक होऊ शकत नाही. तसा पुरावाही त्याने न्यायालयात सादर केला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...