आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला श्रावण महिना!:श्रावण महिन्यात घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी सज्ज; पोलिसांचा असणार कडक बंदोबस्त

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मंदिर देवस्थान सज्ज झाले आहे. या काळात कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

भाविकांच्या निवासासाठी हॉलची व्यवस्था

कोरोना काळात दोन वर्षे भाविकांना श्रावण महिन्यात दर्शन न घेता आल्यामुळे यंदा पहिल्याच श्रावण सोमवारी साधारण दोन लाख भाविक तर तिसऱ्या सोमवारी साधारण चार लाख भाविकांच्या अंदाजानुसार देवस्थान ट्रस्ट तयारी करत असल्याची माहिती अध्यक्ष शशांक टोपरे व कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. तर याचबरोबर या काळात मंदिर परिसरात दिवसभर भाविकांसाठी प्रसाद म्हणून शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.श्रावण सोमवारी मंदिर गाभार्यामध्ये अभिषेक करण्यावरती बंदी असून पार्किंग, वैद्यकीय सुविधेसह रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुक्कामी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानच्या भक्तनिवास मध्ये सहा हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.

पहाटे 2 दोन तास घेता येणार दर्शन

मंदिर परिसरामध्ये साधारण पाच हजार भाविकांच्या सोयी करता कोरोना काळात स्टिलची दर्शनरांग उभारण्यात आलेली आहे. तर मंदिराच्या बाहेर पुरातत्व विभागा मार्फत बैरिकेटिंग करण्यात आलेली आहे. श्रावणमासात दर सोमवारी पहाटे चार ते सात या वेळेत ग्रामस्थांसाठी ओळखपत्र दाखवून सरळ दर्शनाची सवलत देण्यात आली आहे. तर मंदिर परिसरात लक्ष राहण्यासाठी देवस्थान तर्फे चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तर श्रावण मासात मंदिराच्या दर्शनासाठी येणारे भाविक जगप्रसिद्ध वेरुळ लेणीसह मालोजीराजे भोसले गढी, शहाजीराजे भोसले स्मारक, 17 वे पीठ लक्षविनायक गणपती मंदिर, शिवालय तीर्थ कुंड, श्री संत जनार्दन स्वामी आश्रम, टाकास्वामी आश्रम, पार्श्वनाथ दिगंबर जैन पहाड मंदिर, हरिहरात्मक रूक्मिणी पांडुरंग मंदिर, विश्वकर्मा मंदिर, महादेव वनोध्यान सह छोटे मोठे आश्रम, मंदिर येथेही भेटी देतात.

पुरुषांसाठी अर्धवस्त्र परंपरा

भारता मधील बारा ज्योतिर्लिंग पैकी याच घृष्णेश्वर ज्योतिलिंग मंदिरातील गाभार्यात दर्शनासाठी जाणाऱ्या पुरुषांना अर्धवस्त्र म्हणजे कमरेवरील कपडे काढून जाण्याची परंपरा आहे. आख्यायिका नुसार मंदिराच्या पूर्वेस वेळगंगा नदी असून याच नदीमध्ये पूर्वी अर्धवस्त्रांनी किंवा सोहळयामध्ये स्नान करून दर्शन करण्याची प्रथा होती दिवसेंदिवस नदीतील पाणी कमी होत गेले परंतु पुरुषांनी अर्धवस्त्रांनी गाभार्यात जावून दर्शन घेण्याची परंपरा आज मनोभावे तशीच चालू आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

श्रावण महिन्यात भाविकांची होणारी लाखो गर्दी लक्षात घेता ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलिस उपाधीक्षक मुकुंद आघाव, खुलताबाद पोलिस निरीक्षक भुजंग हातमोड़े यांच्या उपस्थिति मध्ये तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये सहा पोलिस अधिकारी, एक पोलिस उपाधिक्षक, 100 पुरुष पोलिस अमलदार, 20 महिला पोलिस अमलदार, बॉम्ब शोधक नाशक श्वान पथक, दंगा काबू पथक यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...