आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरग्रस्त:कॅन्सरग्रस्तांसाठी जायंट्सची केशदान चळवळ, 15 जणींकडून दान

रोशनी शिंपी | औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्करोगाचे उपचार घेताना डोक्यावरील केस गळून जातात. सौंदर्यात सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे केस गेल्याचे दु:ख आणि त्यामुळे येणाऱ्या कुरूपपणाची खंत असते. अशा सर्वांना दिलासा देणे आणि आयुष्याची नवी उमेद जागण्यासाठी केसांचे विग हा पर्याय आहे. म्हणून जायंट्स एलिट क्लबने १३ इंचांपर्यंतचे केशदान करण्याची चळवळ घेतली. यामध्ये दीड महिन्यात १५ जणींनी केशदानही केले.

कर्करोगग्रस्त महिलांना दिलासा देण्यासाठी मुंबईतील मदत फाउंडेशन काही वर्षांपासून विगची मदत करते. जायंट्स एलाइटच्या सदस्यांनी संकलित केलेले केस विगसाठी दिले. या उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख नमिता अग्रवाल म्हणाल्या, यूएसमध्ये राहणाऱ्या माझ्या नंणंदेच्या मुलीने वयाच्या चौथ्या वर्षापासून केस वाढवले होते. मात्र, त्यांची देखभाल करणे अवघड होत गेले. त्यामुळे दहाव्या वर्षी तिने केस कापून कर्करोगींच्या मदतीसाठी पाठवले होते.

यामुळे मला प्रेरणा मिळाली. पण, तेव्हा भारतात अशी काही संकल्पना नव्हती. अलीकडेच मदत संस्थेबद्दल कळले, यातूनच ही चळवळ राबवण्याचे ठरले. आम्ही आवाहन करताच पहिल्या पंधरा दिवसांतच ५ मुली केशदानासाठी पुढे आल्या. यामध्ये पार्लर चालकांची भूमिका महत्त्वाची ठरली. आतापर्यंत १५ जणींनी केशदान केले. रचनाकार कॉलनीमध्ये पार्लर चालवणाऱ्या राजश्री जगताप म्हणाल्या, ५ वर्षांपूर्वी एका तरुणीने केशदानाबद्दल सांगितले. जायंट्सने आवाहन करताच मी त्यांचे पत्रक पार्लरमध्ये लावून घेतले. पार्लरमध्ये येणाऱ्या प्रत्येकीला मी माहिती देत गेले. यातून केशदान होत गेले.

वाढदिवसालाही केशदान
तरुण मुलींमध्ये या चळवळीबद्दल जागृती आणि संवेदनशीलता आहे. त्यामुळे एका तरुणीने आपल्या वाढदिवशी केशदान करण्याचा संकल्प केला. १२ वर्षांपूर्वीचा संकल्प पूर्ण झाला एका नातेवाइकांच्या मुलीने कर्करोगींसाठी केशदान केले होते. तेव्हापासूनच केशदानाचा मी संकल्प केला होता. जायंट्सने आवाहन करताच मी त्याला मूर्तरूप दिले, असे आचल जैन हिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...