आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांच्याकडे हिंदुत्व कुठे राहिले त्यांनी काँग्रेस सोबत जात त्यांचे हिंदुत्व गुडाळून टाकले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माडीवर जावून बसले आहेत. एमआयएमच्या माध्यमातून त्यांनी देखील मदत घेतली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे एमआयएमच्या मांडीवर जावून बसल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे काही बोलले नाही
छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाजन महाजन म्हणाले की हिंदुत्वाच्या बाबत सावरकराच्या विषयावर घ्या. बाळासाहेब ठाकरेची भूमिका काय होती.बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांनी सावकरापबद्दल अपशब्द बोलल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्याना स्वत:च्या पायातले जोडे काढून अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. इतके ज्वलंत विचार त्याचे सावरकराबद्दल होते. इकडे दहा वेळा राहुल गांधी सावरकराबद्दल बोलले. मात्र, राहुल गांंधी बद्दल इतके दिवस उद्धव ठाकरे काहीही बोलले नाही. राहुल गांधी दहा वेळा बोललल्यानंतर ब्र देखील काढला नाही.
ठाकरेंना खुर्चीची लालसा
महाजन म्हणाले की उद्धव ठाकरे यांना खुर्चीची लालसा होती. त्यांना इतकी लालसी होती की बाळासाहेब ठाकरेचे हिंदुत्व त्यांनी गुंडाळून ठेवले होते. ते इतके वाईट बोलले होते की आम्ही ते बोलु सुद्धा शकत नाही. खुर्चीची लालसा त्यांना होती. त्यामुळे ते काहीच बोलले नाही. आता खुर्ची राहिलेली नाही. त्यामुळे त्यानी राहुल गांधीना विरोध सुरु केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत दिल्लीत जावून सोनीया गांधीला जावून भेटून येत आहेत. आता राहुल गांधी बोलणार नाही असे सांगत आहेत. इतक्यवा वेळा ते बोलले त्याचे काय असा सवाल यानी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेची सेना यांचा हिदुत्वाशी काही संबध राहिला नाही. एमआयएमच्या मांडीवर बसलेतर काही आश्चर्य वाटायला नको. अयोध्येला मी देखील जाणार आहे.राम आमचे दैवत आहे. त्यामुळे मी नाशिकमधूनच जाणार असल्याचे त्यांनी सागितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.