आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:खेळ व राजकारण एकमेकांचे पाय ओढण्यासारखे- क्रीडामंत्री गिरीश महाजनांनी केले बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोईसुविधा, समस्या सोडवण्यासाठी क्रीडासाठी विशेष एक दिवस देणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला लवकरच पूर्णवेळ क्रीडा उपसंचालक देण्यात येईल अशी, माहिती राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

ते गुलमोहर कॉलनी येथील बॅडमिंटन हॉलच्या उद्घाटन प्रसंगी शहरात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नेत्यांना बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला.

काय म्हणाले महाजन?

महाजन म्हणाले की, आम्ही खेळाडू व क्रीडा सुविधेसाठी भरघोस निधी दिला आहे. खेळाच्या विकास करणे हेच आमचे लक्ष्य आहे. छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू करू. त्यासाठी निधी दिला आहे. आम्ही बीपीएड, एमपीएडच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना निश्चित संधी मिळेल.

खेळ व राजकारण एकमेकांचे पाय ओढण्यासारखे

आपल्या शालेय जिवनातील किस्से सांगताना महाजन म्हणाले की, मी अनेक खेळात एकाच वेळी खेळत होतो. त्यामुळे यश मिळत नव्हते, मोठी उंची गाठू शकलो नाही. खेळामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. नेतृत्व करणे, रणनिती आखणे, मेहनत घेणे या खेळातील गोष्टीमुळे अखेर राजकारण एकच गोष्ट निवडली.

खेळाचा फायदा राजकारणात झाला यश मिळवले आणि सलग सहा वेळा आमदार बनलो. खेळाप्रमाणे राजकारणातही एकमेकांचे पाय ओढावे लागतात, राजकारणाच्या पटलावरुन आपल्यापेक्षा वरचढला बाहेर ढकलून दयावे लागले.

विभागीय क्रीडा संकुलास १०० कोटी द्या

छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची क्रीडा राजधानी आहे. येथील विभागीय क्रीडा संकुलाची बिकट अवस्था झाली आहे. नागपूरप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासाठी १०० कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली.

बॅडमिंटन हॉलवर ६० लाख खर्च

राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून गुलमोहर काॅलनी येथे ६० लाख रुपये खर्च करुन वुडन क़र्ट असलेला बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला. ठाकरे सरकारच्या काळात त्याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र भाजपचे कार्यकर्ते तथा ठेकेदार प्रशांत नांदेडकर यांनी सदरील काम बंद न करता हॉल उभा केला. त्यावेळी त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले.