आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी खासदार चंद्रकांत खैरे म्‍हणाले की:गिरीश महाजनांचा सल्ला मुळीच ऐकणार नाही

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी माझ्याशी स्वत:हून संपर्क साधला तर मी त्यांच्याशी निश्चितच बोलेन. पण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी त्यांनी दिलेला सल्ला मुळीच ऐकणार नाही, असे उद्धव गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी काही विधाने केली होती. त्यावर खैरे प्रचंड भडकले आणि त्यांनी पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. ‘येऊ द्या त्या टकल्याला, मग मी दाखवतो.’ असेही ते म्हणाले.

याविषयी जळगाव येथे शनिवारी पत्रकारांनी महाजन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, खैरे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याने यापुढे बोलताना थोडे तारतम्य बाळगा, असे खैरे यांना फोन करून सांगेन. पाणीपुरवठामंत्री पाटील व खैरे दोघेही वरिष्ठ नेते असून, त्यांनी बोलताना तोल सांभाळावा. वरिष्ठांना खुश करण्यासाठी काय बोलावे, याचे तारतम्य बाळगले पाहिजे. दोघा नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असेही महाजन म्हणाले. मात्र, त्या वक्तव्याला ४८ तास उलटून गेले तरी महाजन यांनी खैरेंना काॅल केलाच नाही. यासंदर्भात खैरेंकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, महाजनांशी बोलेन. पण बंडखोरांविषयी संयम, तारतम्य बाळगा, असा त्यांचा सल्ला असेल तर तो मी अजिबात एेकणार नाही. बंडोबांवर टीकास्त्र सोडतच राहणार.

बातम्या आणखी आहेत...