आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी रुग्णालयात सुरू होते उपचार:आडगावात कोल्ह्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आडगाव (जेहूर) येथील धम्मपरी समाधान सोनवणे ही तीनवर्षीय मुलगी कोल्ह्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर अखेर सोमवारी तिचा मृत्यू झाला. समाधान सोनवणे आपल्या तीन मुलांसह स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. एक मुलगी थोडी मोठी असल्याने ती आई-वडिलांसोबत मदत म्हणून कापूस वेचत होती. धम्मपरी भावासोबत खेळत होती. तेव्हा एका कोल्ह्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. १५ डिसेंबरपासून तिची तब्येत खालावली होती.

बातम्या आणखी आहेत...