आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावे अश्लील पोस्ट, दोन लाखांची मागणी करणाऱ्या तरुणावर गुन्हा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टाग्रामवर मुलीची बदनामी करत हा प्रकार बंद करायचा असेल तर दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इन्स्टाग्रामवरील arbazz_007 या प्रोफाइलधारकावर सिटी चौक पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे सिटी चौक पोलिस ठाण्यात चोवीस तासांमध्ये तीन तरुणींच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले. दोन बदनामीचे तर एक अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्याचा समावेश आहे.

सिटी चौक परिसरात राहणाऱ्या मुलीची एप्रिल २०२१ मध्ये इन्स्टाग्रामवर एका तरुणासाेबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला. त्या तरुणाने मुलीकडून तिच्या कुटुंबाचे मोबाइल क्रमांक घेतले. छायाचित्र मागवून ते आक्षेपार्हरीत्या एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. एवढ्यावरच न थांबता तिचा मोबाइल हॅक करून सर्व डेटा मिळवत दोन लाख रुपयांची मागणी सुरू केली. घाबरलेल्या मुलीने कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यात प्रोफाइलधारकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निरीक्षक अशोक गिरी यांनी दिले. निरीक्षक अशोक भंडारे अधिक तपास करत आहेत.

व्हिडिओ कॉल रेकॉर्ड नातेवाइकांना पाठवले
दुसऱ्या घटनेत आणखी एका मुलीची बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील मुश्ताक सय्यद मोबीन सय्यद याने फेब्रुवारी २०२१ मध्ये अठरावर्षीय मुलीसोबत ओळख करून घेत तिचा व्हॉट्सअॅप क्रमांक घेतला. नंतर तिला अचानक व्हिडिओ कॉल सुरू केले. त्यानंतर पीडितेचा आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्ड करून तिच्या नातेवाइकांना पाठवले. त्यानंतर तरुणीने सिटी चौक पोलिसांकडे तक्रार केली. तिसऱ्या घटनेत चुलत भावानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समाेर आले. याप्रकरणी भावावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...