आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:सोशल मीडियावर मुंबईच्या तरुणीशी ओळख वाढवून शारीरिक शोषण, 2 लाखांची फसवणूक; औरंगाबादच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगर येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपी रोहन राजेंद्र खाजेकर (२८, रा. रामनगर मुकुंदवाडी, औरंगाबाद) याच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही तरुणी कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिची औरंगाबाद येथील खाजेकरसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. पुढे खाजेकर भेटण्यासाठी मुंबईला गेला. नंतर औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्येही दोघांची भेट झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून ताे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. मात्र, तिने नकार दिला. दरम्यान, ही युवती मार्च महिन्यात बजाजनगर येथील घरी असताना ‘मला डबा दे’ असे म्हणून खाजेकर या मुलीच्या घरी आला. त्यावेळी पीडिता एकटीच होती. याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पुढे मुलीने त्याच्याशी संपर्क साधला असता आरोपीने बोलण्यास व लग्न करण्यास नकार दिला.

दोन लाखांची फसवणूक : खाजेकरने २०१९ मध्ये पीडितेच्या मोबाइलवर फोन करून आपल्या आईसोबत तिचे बोलणे करून दिले होते. त्यावेळी खाजेकरच्या आईने मुलीला सांगितले की, तू मुंबईत जॉब करत आहे. लग्न झाल्यानंतर संसारासाठी पैसे लागणार असल्याने तू दर महिन्याला माझ्या मुलाकडे पैसे पाठवत जा. त्यावर सदर तरुणीने महिंद्रा कोटक बँकेच्या अकाउंटवरून दर महिन्याला दहा ते बारा हजार रुपये पाठवण्यास सुरुवात केली. साधारणत: दोन लाख रुपये मुलाच्या खात्यावर पाठवूनही खाजेकर लग्न करण्यास तयार नसल्याचा उल्लेख तिने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

बातम्या आणखी आहेत...