आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुतांश वेळा अनोळखीपेक्षा परिचितांकडूनच मुलींचा छळ, अत्याचार होतो. अनेकदा आपल्यावरील अत्याचार व्यक्त करण्याचे धाडस मुली करत नाहीत. मात्र, यापुढे तुम्हाला जेव्हा कधी वाटेल की आपण संकटात आहोत किंवा आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटली पाहिजे, त्या वेळी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करा, तत्काळ मदत मिळेल आणि तुमची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने यांनी विद्यार्थिनींना दिले. बजाजनगरातील राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित महिला व मुलींना कायदेविषयक cत त्या बाेलत हाेत्या.
अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष एकनाथ जाधव, गटशिक्षणाधिकारी समाधान आराक, शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सुखदेव, विस्तार अधिकारी दुतोंडे, संस्था सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. एस. एस. कादरी यांची उपस्थिती होती. एकनाथ जाधव म्हणाले, माता सावित्रीबाईंच्या विचारांचा, ज्ञानाचा, संस्काराचा जागर करणे आज काळाची गरज आहे. या वेळी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘माता सावित्रीबाई फुले सन्मान गौरव २०२३’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी सहायक पोलिस निरीक्षक स्नेहा करेवाड, सुरेखा शिंदे, विमल जाधव, उपसरपंच ज्योती साळे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती उचित, सेंट अॅनेट, मोनाली महालपुरे, भारती साळुंके, विद्या भोसले, चंद्रकला शर्मा, रंजना घोडके, कल्याणी सांगोले, स्वाती पटकरी, रत्नमाला कदम, रेखा डिसूझा, अर्चना जाधव, सोनल पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.