आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो मिनिस्टर:सीएम साहेबांचा नंबर द्या, नालीचं काम करून घेतो

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तोंडभरून कौतुक केले. काहीही, अगदी किरकोळ काम असलं तरी कुणीही शिंदेसाहेबांना काॅल करा. ते रिस्पाॅन्स देतात. प्रश्न सोडवतात, असं शिरसाट म्हणाले. झालं, हाच शब्द पकडून एका कार्यकर्त्याने त्यांना दुसऱ्या दिवशी ‘शिंदे साहेबांचा मोबाइल नंबर द्या,’ असा काॅल केला. शिरसाटांनी कशासाठी हवा? असं विचारलं तर तो म्हणाला, गावातलं नालीचं काम होतं. ते शिंदे साहेबांकडून करून घ्यायचंय.

तुमच्यासारखं वरिष्ठांनी िवचारलं तर कळेल उद्धव ठाकरेेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची आघाडी झाली. महाविकास आघाडीत आणखी एका पक्षाची भर पडली. याचा थेट आगामी निवडणुकांशी संबंध असल्याने महाविकासमधील एका पक्षाच्या स्थानिक नेत्याला विचारलं. तर तो म्हणाला, आँ ... असं काही झालंय का? मला तुम्ही विचारलं म्हणून आता कळलं तरी. तुमच्यासारखं पक्षाच्या वरिष्ठांनीही विचारलं आणि मग कुणाशी आघाडीचा निर्णय घेतला तर किती बरं होईल.

जयंत पाटलांना काळजी शिरसाट, चिमणरावांची विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाषणात राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील म्हणाले की, शिंदेंसोबत सुरुवातीलाच गाडीत बसून गेलेले चिमणराव, संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळाले नाही. पाठीमागून आलेल्या गुलाबरावांनी ते पटकावले. एक काँग्रेसच्या विचाराचे टोपीवाले (सत्तार) मंत्री झाले. पण संघ विचाराचे टोपीवाले (बागडे) मात्र उपेक्षित राहिले. यामुळे सत्ताधारी बाकावरचा एक कोपरा मात्र अस्वस्थ होता.

आमच्या नाशकात ‘बंदर’ दिसतच नाहीत हो... ठाकरे सरकारातील कृषिमंत्री दादा भुसेंना शिंदेंनी बंदरे व खनिकर्म मंत्री केले. त्यामुळे नाराज असल्याची चर्चा भुसेंनी वारंवार इन्कार करूनही सुरू असते. विधानसभेत नाशिकचेच हेवीवेट नेते छगन भुजबळ म्हणाले, ‘अहो, आमच्या नाशिक जिल्ह्यात समुद्र नाही. त्र्यंबकेश्वरला चार- दोन ‘बंदरं’ दिसतात. तरी आपल्या जिल्ह्याला बंदराचे मंत्रिपद का मिळाले?’ असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत.’

अंघोळ करून आलोय...म्हणून तरी बोलू द्या विधिमंडळात काही आमदार प्रत्येक मुद्द्यावर बोलतात. त्यामुळे नवख्यांना संधीच मिळत नाही. त्यामुळे नाराज झालेल्या लातूर जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराने ‘अहो, मी सकाळी अंघोळ करून घाईगडीत आलोय अन‌् मला बोलण्याची संधी मिळत नाही म्हणजे काय...?’ असा सवाल त्यांनी केला तेव्हा दोन्ही बाकांवर खसखस पिकली. मात्र सदस्य का हसताहेत हे त्याला क्षणभर कळलेच नाही.

शरदबाबूंच्या खुर्चीसाठी पटोलेंना कोणी पटवले? नाशिक काँग्रेस शहराध्यक्षपद अनेक वर्षांपासून राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हटल्या जाणाऱ्या शरद आहेरांकडे आहे. ग्रामीणमध्ये राहूनही शहराध्यक्षपद पटकावले. राज्यातील सत्तांतरापासून प्रेरणा घेत काँग्रेसचे पदाधिकारी शहराध्यक्षपदाच्या सत्तांतरांसाठी कामाला लागले. नाशकात महिनाभरात दोनदा आलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे आधी शरद बाबूंना हटवा, असे सर्वांनी निक्षून सांगितले. पण त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे पटोलेंना कोणी ‘पटवले’ याचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...