आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाची दखल घ्या:शेतकऱ्याला दिवसाची लाईट द्या, अन्यथा एकही महावितरणचे कार्यालय जागेवर दिसणार नाही- स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

संतोष निकम । औराळा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना कृषीपंपाची वीज दिवसा देण्यात यावी. तसेच वाढीव वीजबिल शासनाने रद्द करावे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. प्रशासन राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कन्नड तालुक्यातील औराळा येथील महावितरणाच्या कार्यालयावर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी राज्यसरकार विरोधात घोषणा देखील दिल्या.

गेंड्याच्या कातडीच्या सरकार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाकडे हेतूपरस्सर दुर्लक्षित करत आहे. या सरकारला आम्ही इशारा देतो की, जर संध्याकाळपर्यंत या आंदोलनाची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरणचे कार्यालय ठिकाणावर राहणार नाही. असा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

आज आम्ही बिलाची होळी केली. संध्याकाळपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातील महावितरणचे कार्यालय पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष गजानन बंगाळे यांनी गुरुवारी दिला आहे. कन्नड तालुक्यातील औराळा येथील महावितरणच्या 33 के.व्ही केंद्रावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाढीव बिलाची होळी करत आंदोलन केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी बोलताना सांगितले की, दोन दिवसापासून माजी खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू असताना सरकारला जाग यायला तयार नाही. हे सरकार ईडीच्या घोटाळ्यामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. राजू शेट्टी करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून, आम्ही आज औराळा येथील महावितरणच्या 33 के.व्ही केंद्रावर महावितरणने दिलेल्या वाढीव बिलाची होळी करून, आंदोलनाला पाठिंबा देतो आहोत. तात्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी पूजा मोरे यांनी यावेळी केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा साबळे, कृषीभूषण भाऊसाहेब थोरात, माजी सरपंच चंद्रकांत देशमुख, रंगनाथ पवार, भारत महाले, नितीन जिवरख, फकीरा पगारे, योगेश निकम, बाबासाहेब पवार, तात्यासाहेब जिवरख, माजी उपसरपंच भालचंद्र वाघ, शिवाजी निकम, एकनाथ जिवरख, केशव निकम, सारंगधर शेळके, पोपटा अहिरे, गोरख आहेर, संदीप काळे, विजय निकम, संतोष मिसाळ, संजय वाघ आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...