आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बळीराजा:आंतरपीक पद्धतीला द्या महत्त्व; खत, कीटकनाशकांचा वापर संतुलित ठेवा

औरंगाबाद ( संतोष देशमुख)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला : उत्पादनात वाढ करण्यासाठी फायदेशीर, फळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड करावी

६५ ते ८० मिमी पाऊस पडलेल्या सर्व ठिकाणी पेरणी व लागवड करावी. जेथे या पेक्षा कमी पाऊस पडला आहे, तेथे पेरणीची अजिबात घाई करू नये. १५ जुलैपर्यंत सर्वच पिकाची पेरणी करता येते. त्यानंतर मूग, उडीद पिकांची पेरणी टाळावी. कोरडवाहू शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने अांतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. मक्यावरील लष्कर अळी, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, मावा, तुडतुडे, अळी व कीड रोगावर मात करण्यासाठी अांतरपीक पद्धत मोलाची ठरेल. शिवाय उत्पादन वाढ करण्यासाठी उपयुक्त राहील. बीज प्रक्रिया करूनच लागवड व पेरणी करावी, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार यांनी दिली. संतुलित वापर ठेवा

अशी घ्या काळजी वीजहानी टाळण्यासाठी विद्युत खांब, वाहिन्या, झाडाखाली थांबू नका. मोबाइल बंद ठेवा. पुरात नदी, नाल्यातून ये-जा करण्याचा धोका पत्करू नका. विहिरी रिचार्ज करा

मान्सूनमधील पावसाच्या खंडावर मात करण्यासाठी व रब्बीचे आतापासून पूर्व तयारीसाठी शेतातील विहिरी व बोअरवेल, शेततळ्यात जास्तीत जास्त पाण्याचा संचय होईल यासाठी शेतातील वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी विहिरी व बोअरवेलकडे वळते करावे. त्यामुळे पाणी व सुपीक मातीचे संरक्षण होईल.

अतिउंच, कीडग्रस्त रोपे लागवडीसाठी टाळावीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रात विविध फळ रोपांची निर्मिती करण्यात आलेली आहे. येथून किंवा त्यांच्या शिफारशीनुसार दर्जेदार रोप खरेदीला महत्त्व द्यावे. वेडीवाकडी, रोगग्रस्त, कीडग्रस्त रोप लागवड टाळावी. साधारणत: दीड ते दोन फुटांचे जातींचे रोप लागवडीसाठी निवडावे. अति उंच रोप लागवडीसाठी टाळावे. भाजीपाला लागवडीसाठी गादी वाफ्यांचा वापर करावा. बुरशीनाशक द्रावणात रोप बुडवून मग लागवड करावी, अशी माहिती बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख तथा फलोत्पादनतज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी शेतीच्या सुपीकतेनुसार, माती परीक्षणानुसार खते, कीटकनाशकांचा वापर संतुलित ठेवावा. विशेषत जैविक, जीवाणू संवर्धन खते आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होईल. शेतीचा पोत टिकून राहील व उत्पादन व पर्यायाने उत्पन्नात वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

पावती अवश्य घ्या, पीक संरक्षण करूनच फवारणीला द्या महत्त्व बी-बियाणे, खते व कीटकनाशक खरेदी करताना त्याची पावती आवश्यक घ्यावी, जेणेकरून फसवणूक झाली तर तुम्हाला दाद मागण्यासाठी व नुकसान भरपाई करता उपयुक्त ठरेल. तुम्हाला जे बी बियाणे व खते, कीटकनाशके हवेत तेच खरेदी करावे. पीक सर्वेक्षण करावे. यातून तुम्हाला कीड कोणती? उपाय काय करायचे? हे स्पष्ट होईल. यासाठी जवळील कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्या शिफारशीप्रमाणे खते, कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना सुरक्षित साधनांचा वापर करावा. यातून विषबाधा टाळता येईल. राज्यात सर्वत्र मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. कमी अधिक फरकाने पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी, कृषी बाजारपेठेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पेरणीला, फळबाग लागवडीला वेग आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अति घाई करू नये. ८५ टक्के शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे अांतरपीक प्रद्धतीला महत्त्व द्यावे. खत, कीटकनाशकांचा वापर संतुलित ठेवावा. यातून उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरेल. --------------

बातम्या आणखी आहेत...