आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा निकाल:पहिली ते नववी, अकरावीचा निकाल जाहिर करण्याच्या सूचना, ऑनलाइन अथवा एसएमएसद्वारे द्या विद्यार्थी पालकांना माहिती

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • नव्या शैक्षणिक सत्रासंबंधी देखील पालक-विद्यार्थी संभ्रमात आहेत

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर करण्यात यावा अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी विभागीय शिक्षण उपसंचलक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोना विषाणूने जगभरात थौमान घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथमच सर्व शाळा-महाविद्यालयांना परीक्षा सुरु होण्यापूर्वीच सुट्या देण्यात आल्या होत्या. तर दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. कोरोनाचा प्रभाव विविध क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक सत्रावरही मोठ्या प्रमाणात झाला. शाळा बंद असल्याने सरासरी गुण देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र दरवर्षी १ मे रोजी दहावी वगळता इतर वर्गांचे निकाल जाहिर करण्यात येत. परंतु ही पहिलीच वेळ असेल की निकाल जाहिर झाला नाही. देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला ३ मे त्यानंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे नव्या शैक्षणिक सत्रासंबंधी देखील पालक-विद्यार्थी संभ्रमात आहेत.

या पार्श्वभूमीवर मूल्यांकनाबाबतही सूचना स्पष्ट करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दूरध्वनी, एसएमएस अथवा इतर ऑनलाइन पद्धतीने तात्काळ निकाल कळवावा जेणे करुन विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहणार नाही. त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करणे उपलब्ध साहित्याच्या आधारे सुरु करणे शक्य होईल. असे पाटील यांनी दिलेल्या सूचना पत्रात म्हटले आहे. तसेच स्थानिक लॉकडाऊन परिस्थितीनुसार पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना निकालपत्रक देण्यासाठीची आवश्यक कार्यवाही शाळा, महाविद्यालयांनी करावी. असेही पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...