आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शहिद डॉक्टर, नर्सच्या पाल्यांना वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठी आरक्षण द्या - डॉ.काळे

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

राज्यातील डाॅक्टर ,नर्स आपला स्वताचा जीव धोक्यात घालून 'कोविड १९' चा सक्षमपणे सामना करीत आहेत. 'कोविड-1९'च्या रुग्णांवर उपचार करताना शहिद झालेले डाॅक्टर, नर्स यांच्या पाल्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी विषेश आरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे. महाराष्ट्रासह देशांमध्ये कोरोनाचा फैलाव सुरू आहे. 'कोविड १९' चा संसर्ग वाढत असून हजारो नागरिक या आजाराचे बळी पडत आहेत, शिवाय अशा रुग्णांवर उपचार करताना रोगाचा प्रादुर्भाव होऊन डॉक्टर, नर्स यांना आपला जीव गमवावा लागत आहे,  अशा घटना महाराष्ट्रात काही ठिकाणी घडल्या आहेत त्यामुळे त्यांचे पाल्य अनाथ झाले आहेत अशा पाल्यांना राज्य शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी विशेष आरक्षण द्यावे अशी मागणी डॉ नरेंद काळे यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. शासनाने एन-९५  मास्क आणि पीपीई च्या किंमती नियंत्रित कराव्यात अशीही मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...