आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:‘भोई समाजाला एससी, एसटीमध्ये आरक्षण द्या’

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोई समाजाला एससी किंवा एसटीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आली. मजनू हिल येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीस राज्यभरातील पदाधिकारी हजर हाेते. भोई समाजाचा प्रतिनिधी विधान परिषदेत नियुक्त करावा, अशीही मागणी करण्यात आली. मे महिन्यात संघटनेचा मेळावा घेण्याचे ठरले. या वेळी संघटनेचे महासचिव गजानन साटोटे, ए.सी. भोईर, ए. के. भोई, एकनाथराव काटकर, संजय भाटे, प्रा. रामनाथ वाडे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...