आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम:शेतकऱ्यांना बियाणे खते बांधावर द्या, आम आदमी पक्षाची विभागीय आयुक्तांकडे मागणी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील शेतकर्‍यांना बांधावर बियाणे आणि खत देण्याची गरज आहे. मराठवाड्यात कुठेच शेतकर्‍यांना त्यांच्या बांधावर बियाणे व खत देण्यात येत नाहीत. याआधी बांधावर खते व बियाणे देण्यात येत होते. मात्र, यावर्षी सरकारने या योजनेतुन अंग काढून घेतल्याचे दिसून येत असल्याचे मराठवाडा संघटनमंत्री सुग्रीव मुंडे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुंडे पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांना बियाणे, खते आणि औषधी यामध्ये अनेक बोगस कंपन्यांचा बाजारामध्ये शिरकाव झालेला आहे. यावर सरकारच्या वतीने मराठवाड्यातील कोणत्याच जिल्ह्यात बोगस बियाणे, खते आणि औषधे यावर कारवाई केलेली दिसून येत नाही. जिल्ह्यातील सरकारची पथके नेमलेली आहेत की फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी अनेक बियाणे बोगस निघाल्याने लाखो शेतकर्‍यांची फसवणुक झालेली आहे. त्या शेतकर्‍यांना दुबार पेरणी करण्याची वेळ गेल्यावर्षी आली होती. तीच परिस्थिती यावर्षी निर्माण होवू नये म्हणून सरकारने आत्ताच या बोगस कंपन्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, सरकार या कंपन्याचा पाठीशी घालत आहेत का? असा सवाल मुंडे यांनी केला आहे.

सावकराच्या दारात उभे राहण्याची गरज पडणार नाही

अनेक शेतकर्‍यांचे अतिवृष्टी, कोरोनाचा काळ आणि अनेक शेतकर्‍यांच्या उसाचा प्रश्न गंभीर झाल्याने बर्‍याचे शेतकर्‍याचे बँकेकडील घेतलेले पीक कर्ज परत करता आले नाही. ते शेतकरी एनपीए मध्ये जावू शकतात. अशा शेतकर्‍यांना त्यांचे कर्ज नवे जुने करून ते पीककर्ज पुर्ववत करावे आाणि ज्या शेतकर्‍यांना अजुनही पीक कर्ज दिलेले नाही, त्या शेतकर्‍यांना तातडीने पीककर्ज वितरीत करावे. जेणेकरून त्यांच्या पेरणीसाठी उपयोगी पडेल. तसेच मराठवाड्यामध्ये आदिवासी शेतकरी आहेत मात्र या शेतकर्‍यांना मराठवाड्यातील बँका उभ्याच करीत नसल्याने अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचीत आहेत. अशा आदिवासी शेतकर्‍यांनी सातबारा असेल त्या शेतकर्‍याला शासनाने कर्जपुरवठा करावा जेणे करून शेतकर्‍याला खासगी सावकराच्या दारात उभे राहण्याची गरज पडणार नाही. ही सरकारची जबाबदरी असून ही जबाबदारी सरकाने टाळू नये असा इशाराही आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठवाड्यामध्ये ज्या शेतकर्‍याचा उस उसतोड होउन गेला नाही, अशा शेतकर्‍याचे तातडीने पंचनामे करून त्या शेतकर्‍यांना किमान हेक्टरी अडीच लाख रूपये मदत द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त कार्यालयसह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी दत्तु पवार ,अजबराव मानकर ,अशीर जयहिंद ,सत्यप्रकाश राठोड ,सौ.रुपालीताई धनेधर ,राजेन्द्र माळी ,मजाज खान ,शंकर गावडे , आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...