आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची मालमत्ता:सावकाराने लाटलेले घर शेतकऱ्यास द्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकऱ्याची मालमत्ता सावकाराने आपल्या ताब्यात २०१० पासून ठेवली आहे. शेतकऱ्याने व्याजाने घेतलेली रक्कम परत करूनही मालमत्तेवरील ताबा सोडलेला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. वाय.डी. खोब्रागडे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना सहा आठवड्यांत नांदेड येथील उपनिबंधकांंच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले.

प्रवीण मंमईवार याने नांदेड येथील सावकार नंदमगौडा नरागौडा उपुनुतुना यांच्याकडून व्याजाने रक्कम घेतली होती. मालेगाव येथील सर्व्हे क्रमांक १९ मधील घर तारण ठेवले होते. सावकाराने संबंधित मालमत्तेच्या तारणापोटी २४ लाख शेतकऱ्यास दिल्याचे म्हटले होते. शेतकऱ्याने याविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियम) अधिनियम २०१४ कलमांअंतर्गत नांदेड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाद मागितली होती. जिल्हा उपनिबंधकांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर सावकाराने अपील केले मात्र तेही फेटाळण्यात आले. तरी त्याने शेतकऱ्याला ताबा दिला नाही.

अर्धापूर तहसीलदारांनी २७ जून २०२२ रोजी सावकाराकडून मालमत्ता ताब्यात घेऊन शेतकऱ्यास देण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दिले हाेते. तीही कारवाई झाली नाही, त्यामुळे अखेर शेतकऱ्याने खंडपीठाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने त्याला न्याय मिळवून दिला.

बातम्या आणखी आहेत...