आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Give Water Only For 55 Days, Then Take Water For Only Rs. 610; BJP's Strike On Municipal Administrator's Bungalow Against Water Scarcity, Congress On The Streets To Protest Against Inflation | Marathi News

भाजप:55 दिवसच पाणी देता, मग 610 रुपयेच पाणीपट्टी घ्या; पाणीटंचाईिवरोधात भाजपची मनपा प्रशासकांच्या बंगल्यावर धडक, महागाईच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी नाही तर पाणीपट्टी नाही, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने एक एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयात जोरदार आंदोलन केले. त्यापाठोपाठ भाजपनेही ५५ दिवस पाणी देता, मग ६१० रुपयेच पाणीपट्टी घ्यावी, असा पवित्रा घेतला.

सिडको एन-५ येथील जलकुंभासमोर जोरदार घोषणाबाजी केली. पाणी पुरवठ्यात सिडको-हडकोशी दुजाभाव बंद करावा. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनीच प्रत्यक्ष येऊन म्हणणे ऐकून घ्यावे, अशीही त्यांची मागणी होती. ती पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्यावर भाजप कार्यकर्ते प्रशासकांच्या जलश्री या निवासस्थानावर जाऊन धडकले. ५ एप्रिल रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यात महत्त्वाची बाब म्हणजे २००९-१० मध्ये भाजपच्या विजया रहाटकर महापौर असताना शिवसेनेच्या पाठिंब्याने पहिल्यांदा पाणीपट्टी वाढीचा धोरणात्मक प्रस्ताव मंजूर झाला होता.

सध्या वर्षाची पाणीपट्टी ४०५० रुपये म्हणजे एका दिवसाची ११ रुपये ९ पैसे आहे. या हिशेबाने ६०९ रुपये ५५ पैसे होतात. सोमवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या आंदोलनात हाच मुद्दा होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी आमदार अतुल सावे यांच्यासह प्रमुख १४ आंदोलकांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२००९ मध्ये पाणीपट्टी वाढीचे धोरण भाजपच्याच नेतृत्वात मंजूर
तासभर आमदार वेटिंगवर

आमदार सावेंनी साडेदहा वाजेनंतर प्रशासकांना अनेकदा कॉल केले. मेसेज पाठवले, पण त्यांनी प्रतिसाद दिलाच नाही. मात्र धांडेंच्या मोबाइलवरून ते सावेंशी बोलले. याबद्दल सावे यांनी तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली.

सिडकोतून टँकरच्या फेऱ्या बंद
एन-५ जलकुंभावरून रोज टँकरच्या किमान १८० फेऱ्या होतात. दुपारी ११ वाजेपर्यंत आंदोलनामुळे टँकर थांबले. परिणामी गारखेडा, रामनगर, शिवाजीनगर, चिकलठाणा भागातील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

उपअभियंता ते अतिरिक्त आयुक्त : सर्वांनाच आंदोलकांनी परत पाठवले
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक पद्मे, के. एम. फालक, कार्यकारी अभियंता किरण धांडे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे यांच्याशी चर्चा करण्यास आंदोलकांनी नकार दिला. ११.३० वाजता खासगी दोन बसेसने ते प्रशासकांच्या बंगल्यावर धडकले. एकूण रागरंग पाहून पांडेय यांनी बारा वाजेच्या सुमारास निवासस्थानाबाहेर येत ८२९ जणांच्या सह्या असलेले निवेदन स्वीकारले. किमान तीन किलो वजनाच्या यापूर्वीच्या निवेदनांच्या प्रतीही त्यांना देण्यात आल्या. दहा दिवसांत पाणी पुरवठ्यात सुधारणेचे आश्वासन पांडेय यांनी िदले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, प्रमोद राठोड, बालाजी मुंडे, राजगौरव वानखेडे, महेश माळवदकर, अ‍ॅड. माधुरी अदवंत, रेखा जैस्वाल, गणेश नावंदर, अरुण पालवे, सागर पाले, डॉ. सतीश खेडकर, नितीन खरात, अमय देशमुख, बालाजी मुंढे, मनीषा मुंढे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...