आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया:औरंगाबादला सायाळ, स्पूनबिल, इमू, कोल्हा देऊन अहमदाबाद वाघ नेणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. यात सध्या सायाळ, स्पूनबिल, इमू, कोल्हा हे प्राणी एकटेच आहेत. त्यामुळे मनपाने अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयातून त्यांना जोडीदार घेऊन येण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, अहमदाबाद येथील अधिकाऱ्यांनी त्या बदल्यात एक वाघाची जोडी किंवा एक वाघ देण्याची विनंती केली आहे. त्या पद्धतीने सिद्धार्थ उद्यानाने प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयात सायाळ, स्पूनबिल, इमू, कोल्हा अधिक संख्येने आहेत. त्यामुळे त्यांनी हे प्राणी देण्यास तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे प्राण्यांच्या हस्तांतरणाबाबत परवानगी मागणार आहे. परवानगी दिल्यानंतर हे प्राणी औरंगाबादेत आणले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशभरात पाठवले २६ वाघ : औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात सध्या १४ वाघ असून आतापर्यंत देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांना सुमारे २६ वाघ दिले आहेत. येथे ३० हून अधिक वाघांचा जन्म झाला आहे. त्यामुळेच देशभरातील प्राणिसंग्रहालय अधूनमधून औरंगाबादकडे वाघांची मागणी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...