आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० डिसेंबरला स्क्रीनिंग:कोलकाता फिल्म फेस्टिव्हलसाठी‘ग्लोबल आडगाव’ची झाली निवड

रोशनी शिंपी | औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ग्लोबल आडगाव’ हा चित्रपट नसून व्यवस्थेविरुद्धचा एक एल्गार आहे. शेतकरी पुत्राने सरंजामशाही व्यवस्थेविरुद्ध केलेली क्रांती आहे. अलीकडील काळात शेतकऱ्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने होत आहे. या विषयाकडे लक्ष वेधणारा हा सिनेमा आहे, असे सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांनी सांगितले.

‘ग्लोबल आडगाव’ सिनेमाची जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मानल्या जाणाऱ्या कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. दीड हजार सिनेमांतून १४ भारतीय सिनेमांची निवड झाली. यामध्ये ‘ग्लोबल आडगाव’ची निवड झाली, ही बाब औरंगाबादकरांसाठी अभिमानाची आहे. यानिमित्त ‘दिव्य मराठी’ने साळवे यांच्याशी संवाद साधला. साळवे म्हणाले, ‘सात वर्षांपासून कथा लिहीत होतो. ‘ग्लोबल आडगाव’ नावाचे नाटक केले होते. त्याला ५२ पुरस्कार मिळाले. रिमा लागूंनी सिनेमा पाहिला, तेव्हा त्यांनी या नाटकावर चित्रपट करण्याचा सल्ला दिला होता.

९५ टक्के निर्मात्यांनी दिला होता चित्रपटास नकार
कथा पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील अनेक निर्मात्यांना ती वाचून दाखवली. पण ९५ टक्के जणांनी शेतकऱ्यांची व्यथा आहे म्हणून नाकारले. काहींनी प्रेमकथेला ग्लोरिफाय करण्याचा सल्लाही दिला. शेवटी २०१८ मध्ये अमृत मराठे, मनोज कदम यांनी या कथेला होकार दिला. मात्र, कोविडमुळे अडचण निर्माण झाली.

बातम्या आणखी आहेत...