आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राम मंदिर:अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीसाठी पैठण येथील गोदेचे जल व वाळू पाठवणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम मंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या गोदावरीचे जल आणि वाळूचे पूजन करताना कार्यकर्ते.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा शुभारंभ ५ ऑगस्टपासून होत आहे. या निर्माण कार्यासाठी देशातल्या प्रत्येक तीर्थक्षेत्रातील पवित्र जल व वाळू पाठवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिणेची काशी असा लौकिक असलेल्या पैठण येथील गोदावरी पात्रातून देवगिरी प्रांत विश्व हिंदू परिषदतर्फे पवित्र जल आणि वाळू अयोध्येला विधिवत पूजा करून रवाना करण्यात आले. बजरंग दलाचे सतीश आहेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विहिंपचे कार्यकर्ते मकरंद जोशी व योगिराज महाराज भास्कर यांच्या हस्ते पूजन करून अयोध्या येथे रवाना करण्यात आले. या वेळी वेदशास्त्रसंपन्न रवींद्र साळजोशी, पू.भागवताचार्य प्रसाद महाराज भागवत, विजय चाटुपळे, वे.शा.सं गणेश जोशी, पंडित फंड, सीताराम कीर्तिकर, वासुदेव घाग, गणेश पादर उपस्थित होते.