आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद खंडपीठातील वकिलांसाठी ‘गोज्युरीस’ लीगल ॲपचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वकील संघाच्या ग्रंथालयात १३ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन व सचिव अॅड सुहास उरगुंडे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.
विशेष म्हणजे ही सुविधा खंडपीठ परिसरात वकिलांना मोफत पुरवण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. या ॲपद्वारे वकिलांना सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील १९५० पासूनच्या विविध निवाड्यांचे संदर्भ, केस लॉ, केंद्रीय आणि राज्य शासनाचे विविध कायदे, कायद्यातील नवीन दुरुस्त्यांची माहिती, कायदेविषयक बातम्या, लेख उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार, वकील संघाच्या उपाध्यक्ष निमा सूर्यवंशी, बाळासाहेब मगर, शुभांगी मोरे, प्रदीप तांबडे, दयानंद भालक, कृष्णा रोडगे, राकेश ब्राह्मणकर, संकेत शिंदे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.