आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शहानूरवाडीतून 5 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्याने कपाटातील रोख १५ हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ९५ हजार ७४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३१ जुलै रोजी पहाटे शहानूरवाडीत उघडकीस आली. याप्रकरणी देव अंबेकर यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंबेकर हे पत्नी व मुलीसाेबत जेवण करून रात्री झाेपी गेले. पहाटे ५.४५ वाजता मुलगी रडत असल्याने तिला पाणी देण्यासाठी त्यांच्या पत्नीने स्वयंपाकघराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांना आवाज देत दरवाजा उघडण्यास सांगितले. नंतर घरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...