आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पुणे- औरंगाबाद प्रवासात बॅगेतून सोने, हिऱ्याचे दागिने लंपास ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-औरंगाबाद बसने प्रवास करताना शेजारी बसलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या पर्समधून सोने, हिऱ्याचे दागिने लंपास केले. मात्र, अकरा दिवसांनंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मूळ औरंगाबादच्या प्राप्ती जामगावकर या पुण्याला वास्तव्यास असतात. २६ ऑक्टोबर रोजी त्या नगरवरून बसने औरंगाबादसाठी निघाल्या होत्या. सायंकाळी ६ वाजता बस औरंगाबादला पोहोचली. त्याचदरम्यान त्यांना पर्समधून दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले.

त्यांच्याजवळ दोन महिला बसल्या हाेत्या. त्यांच्याकडे लहान मुलगा होता. जामगावकर यांनी त्यांची बॅग दोन सिटीमध्ये असलेल्या जागेत ठेवली हाेती. तेव्हा एका महिला स्कार्फ मोठा करून उभी राहिली. तेव्हाच दागिने चोरीला गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बॅगेत अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, २.३२ कॅरेटचे हिऱ्याचे झुमके व एक तोळ्याचे सोन्याचे कानातले असा ऐवज होता.

बातम्या आणखी आहेत...