आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय बालगट ग्रेपलिंग स्पर्धा:साईनाथ, आराध्या, स्वराजला सुवर्ण; जालन्याला विजेतेपद

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र व औरंगाबाद संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय बालगट ग्रेपलिंग स्पर्धेत जालना संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान औरंगाबादचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला. विभागीय क्रीडा संकुलावर झालेल्या स्पर्धेत साईनाथ कुबेर, आराध्या कुबेर, महेश रणपिसे, स्वराज राठोड, मुग्धा पाटील आदींनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची डेहराडून (उत्तराखंड) येथे १९ ते २१ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय ग्रेपलिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी कन्हैयालाल माळी यांची, तर संघ व्यवस्थापक म्हणून भगवान भुवर यांची निवड केली.

बातम्या आणखी आहेत...