आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक:अंशुमन, प्रेम, विधी, सौम्याला सुवर्णपदक; किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 197 खेळाडूंचा सहभाग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा व शहर किक बॉक्सिंग संघटना व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अंशुमन मिरकर, शिवशंकर तेली, प्रेम लोखंडे, तन्मय देवरे, सौम्या सोळुंके, विधी चोपडे, तपस्या पाटील, आनंद कटाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत एकूण १९७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघात निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंना कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

विजयी खेळाडू पुढील प्रमाणे : सुवर्ण - अंशुमन मिरकर, शिवशंकर तेली, परिनिधी लाटे, प्रेम लोखंडे, अनिमेष वावतुळे, तनिष रिठे, तन्मय देवरे, आरव मिरकर, सोहम मिसाळ, श्लोक डिक्कर, सौम्या सोळुंके, विधी चोपडे, तपस्या पाटील, आनंद कटाळे, शिवराज उबाळे, अक्षय सोनटक्के, आयुष चाटूपल्ले, अजिंक्य गाढवे, श्रावणी सोनवणे, आंचल यादर, देविका सोनवणे, वैष्णवी जैस्वाल, श्रेया कुलकर्णी, आलोक देशमुख, श्रीकांत हिवराळे, पार्थ पवार, वेदांत पाटील, सुमीत नागरे, कृष्णा सूर्यवंशी, नमिता कोलते, श्रावणी पवार, स्वानंदी कुलकर्णी, पूर्वा सोमवंशी, सृष्टी मुळे, नरेंद्र संतान्से, समीक्षा मांजमे, सृष्टी अकोलकर, तुषार बंगाले, कौस्तुभ लोळगे, रोहिणी बनसोडे, प्रथमेश पंडित, सुमीत नागरे, पवित्रा जाधव, अदित्य मोरे, पवन वंजारे, अश्लेषा मोरे, स्वप्निल सूर्यवंशी, प्रांजल देवरे.

बातम्या आणखी आहेत...