आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय बालगट व कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत:सृष्टीला सुवर्णपदक; समीक्षा, किंजलला रौप्य

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बालगट व कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत एकूण ६ पदके जिंकली. यात १ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. सृष्टी वावधनेने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. समीक्षा सोनवणे व किंजल सोनवणेने रौप्यपदक पटकावले. अग्रिशा आधात, क्षितिज बावसकर व कैवल्या पाटीलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत ३२ जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना प्रवीण कुमार, सुनील बसनेत, कुणाल राठोड आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष प्रतिभा सानप, सचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी, मोहित देशपांडे, रूपेश शिंदे, संकेत व्यवहारे, संकेत बागूल आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...