आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफंडा असा की, तुम्ही समाजासाठी चांगले काम करत आहात, म्हणजे चांगुलपणाच्या पुराव्याची गरज नाही, असा विचार करू नका. आपण चकाकणाऱ्या जगात राहतो, म्हणून कलियुगात कधी कधी पुराव्याची गरज भासते... चांगल्या कामासाठीही!
याच आठवड्यातील गोष्ट. रस्त्यावरून जाताना मी पाहिले, कुटुंबातील पाच जण एका थाळीत जेवत होते. वंचित घटकातील ते लोक जवळच्या एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी आले होते. ताटात भात होता आणि वर पोळी चार तुकडे करून ठेवली होती. एक लहान प्लेटही होती, ज्यात काही कापलेले कांदे-लोणचे होते. त्यातील महिला बहुतेक मुलांची आई असेल, एकदम पातळ डाळ असलेले पातेले आणत होती. त्याचे तळ सहज दिसत होते. त्या लोकांना मी दोन पाकिटे सँडविच देऊ केले, जे त्याच दिवशी सकाळी प्रवासादरम्यान मला विमानात देण्यात आले होते. मुलांच्या ते घ्यायचे होते, त्यांच्या डोळ्यात ते दिसत होते, मात्र आईचे मोठे डोळे त्यांना रोखत होते. माझी इच्छा सांगत, त्यांना राजी करण्यात माझा काही वेळ गेला, त्यांना सांगितले, ते कुठे मिळाले आणि कधी तयार झाले. सेल्स जॉबपेक्षा ते सांगणे कमी नव्हते.
मी कारमध्ये बसलो आणि विचार करू लागलो. कारमध्ये जेवण होते आणि बाहेर असे एक कुटुंब होते जे त्यांच्या रोजच्या गरजांसाठी संघर्ष करत होते. यातून मला जाणवले, भोजन नेहमीच व्यापक पद्धतीने उपलब्ध असले तरीही अनेक जण त्याशिवाय असतात.
संयुक्त राष्ट्राच्या संशोधनानुसार जागतिक उपासमार वाढत जाणारी समस्या आहे. एका आकलनानुसार सन २०१९ मध्ये ६९ कोटी लोक रोज रात्री उपाशी झोपले. महामारीमुळे ही संख्या ८.३ ते १३.२ कोटी आणखी वाढली. आता तर युक्रेन युद्धामुळे प्रमुख पिकांच्या पुरवठ्यालाही धोका आहे, जग एक संभाव्य अन्न संकटाचा सामना करत आहे. वाढत्या किमतीमुळे ते आणखी काही कोटी लोकांना गंभीर भुकेच्या धोक्यात टाकू शकते. जर ही भीती खरी ठरली तर ही आपल्या शिक्षित आणि थोड्याफार चांगल्या स्थितीत असलेल्या लोकांची जबाबदारी आहे की, जेवण हुशारीने वापरायचे आणि ते वाया जाण्यापासून वाचवून उपाशींना वाटायचे.
आणि तेव्हा मला विशालसिंग ठाकूर आणि त्यांचा बेघर सहायक घनश्याम बाथरेची आठवण झाली, जे जेवण वाया जाण्यापासून वाचवतात आणि जे लोक वाढदिवशाी जेवण दान करू इच्छितात, ते खऱ्या उपाशींना गाडखारा रेल्वेस्थानकावर वाटतात. ज्यांना माहिती नाही की, गाडखारा कोठे आहे, त्यांना सांगतो की ते मध्य प्रदेशात भोपाळ-जबलपूरदरम्यान आहे. तेथून अनेक एक्स्प्रेस रेल्वे जातात, तरीही स्थानकावर खाण्याची सुविधा नाही, काही गाड्या येथे थांबतात. रोज सायंकाळी स्थानकाबाहेर एक विचित्र दृश्य पाहायला मिळते, तेथे कुणीही जाऊन पाहू शकते की, विशाल फक्त स्थानिक बेघर लोकांना आणि गरिबांनाच जेवण देत नाही तर घरचे जेवण पॅक करून त्या लोकांनाही देतात ज्यांची गाडी निघून गेली असेल आणि पुढच्या गाडीची वाट पाहत उपाशी असतील. ते चेहऱ्याकडे पाहून विचारतात, मला वाटते तुम्हाला भूक लागली आहे, कृपया खाऊन घ्या. ही व्यक्ती त्या लोकांना आपले व्हिजिटिंग कार्ड देते, जे त्यांच्याकडून जेवण घ्यायला संकोचतात. या कार्डवर नाव नाही, फक्त ‘विशाल राम रोटी सेवा’ लिहिले असते आणि हे काम २०१५ पासून सुरू असल्याचे असते. यावर मोबाइल क्रमांक असतो आणि पत्ता आहे गाडखारा स्थानक. मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.