आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संख्याशास्त्र विषयाचा पेपर:गणिताची भीती वाटणाऱ्यांना चांगले गुण

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून, शुक्रवारी गणित आणि संख्याशास्त्र विषयाचा पेपर झाला. त्यामुळे गणिताची भीती वाटणाऱ्यांनाही चांगले गुण मिळतील. सामान्य आणि मध्यम गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला आहे. काही प्रश्नांचे स्वरूप संमिश्र असल्याचे शहरातील गणित विषयाच्या शिक्षकांनी सांगितले.

सराव करणाऱ्यांना सोपा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गणिताचा पेपर सोपा गेला. पेपरची काठिण्य पातळी अधिक नव्हती. त्यामुळे गणिताची भीती वाटणाऱ्यांनाही चांगले गुण मिळतील. -प्रा. प्रताप काशीद, राज्य अभ्यास मंडळ सदस्य

प्रश्नपत्रिकेत चूक नव्हती प्रश्नपत्रिकेत चूक नव्हती. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप संमिश्र होते. त्यामुळे मध्यम गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आजचा पेपर सोपा गेला आहे. फक्त चार गुणांच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. -प्रा. बाळासाहेब पोवळ

बातम्या आणखी आहेत...