आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधी जयंती:सोमवारपासून सद्भावना यात्रा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आनंदग्राम ते सेवाग्राम सद्भावना सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पाली (जि. बीड) येथून २६ सप्टेंबरला यात्रा सुरू होईल.

समारोप २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथे सेवाग्राम बापू कुटीत होईल. इन्फंट इंडियाच्या आनंदग्राम एड्सग्रस्त मुला-मुलींचा पुनर्वसन प्रकल्पातर्फे हा उपक्रम होत आहे. आनंदग्रामने दोन वर्षांपासून आजूबाजूच्या खेड्यापाड्यात महात्मा गांधींचा “खेड्याकडे चला’, हा संदेश घेऊन संवाद यात्रा केली. वर्षभरात १०० खेड्यांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प पूर्ण केल्यावर समारोप गांधी जयंतीला सेवाग्राम येथे करण्याचा निर्धार होता. त्यानुसार निघणारी सायकल यात्रा पाली-बीड-माजलगाव- मानवत-परभणी-औंढा नागनाथ-हिंगोली-पुसद-यवतमाळ-वर्धा- सेवाग्राम या मार्गाने जाणार असल्याचे संचालक दत्ता बारगजे यांनी सांगितले. नावनोंदणीसाठी ७२१८४८१३७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...