आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलमध्ये जातीयवाद:गुगलवर सवर्ण प्रेशर ग्रुपच्या दबावात दलित विचारवंताचा शो रद्द करण्याचा आरोप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलवर जातीयवादी होण्याचा आरोप केला जात आहे. गुगलने आपल्या सवर्ण कर्मचाऱ्यांच्या दबावानंतर दलित विचारवंत थेनेमोजी सुंदरराजन यांचा कार्यक्रम रद्द केल्याचा आरोप आहे. घटना या एप्रिल महिन्यातील आहे. तेव्हा गुगल न्यूजच्या सीनियर मॅनेजर तनुजा गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांत इक्वलिटी लॅब्जच्या संस्थापक थेनेमोझी सुंदरराजन यांना बोलावले होते. गुगलच्या काही भारतीय अमेरिकी कर्मचाऱ्यांनी “भास्कर’ला सांगितले की, सुंदरराजन यांच्या कार्यक्रमाची चर्चा होताच काही कर्मचाऱ्यांनी विरोध केला की, सुंदरराजन हिंदू फोबियाग्रस्त आणि हिंदू विरोधी आहेत. सुंदरराजन प्रतिष्ठित दलित कार्यकर्त्या असून त्यांना मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स, एअरबीएनबी, नेटफ्लिक्स आणि अॅडोब यासारख्या कंपन्यांनी आपल्याकडे व्याख्यानासाठी बोलावले होते.

गुगलच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले की, येथे जातीय समानतेच्या चर्चेमुळे आमचे प्राण जोखमीत पडू शकतात. सवर्ण कर्मचाऱ्यांनी गुगलच्या ८००० भारतीय-अमेरिकी कर्मचाऱ्यांसह आपल्या व्यवस्थापकाला एक अंतर्गत ई-मेल पाठवला. त्यानंतर सुंदरराजन यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या घटनेकडे गुगलमध्ये वाढत असलेली हिंदुत्व समर्थक मोहीम अशा रूपात पाहिले जात आहे. सुंदरराजन यांना आमंत्रित केल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे, ट्रोल केले जात आहे, असे म्हणत या शोचे आयोजन करणाऱ्या वरिष्ठ व्यवस्थापक तनुजा गुप्ता यांनी नोकरी सोडली आणि हा मुद्दा चर्चेत आला. तनुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉक शो रद्द करण्याचा निर्णय त्यांच्या बॉस आणि गुगल इंजिनिअरिंगच्या उपाध्यक्षा कॅथी एडवर्ड्स यांचा होता. कार्यक्रम रद्द झाल्यानंतर तनुजा यांनी स्वत: सुंदरराजन यांच्यासोबत या विषयावर शो केला, त्यात अमेरिकी कार्यसंस्कृतीत जातीय आधारावरील भेदभावावर चर्चा झाली. विशेष म्हणजे तनुजा यांच्या बॉस कॅथी एडवर्ड्सही या चर्चेत सहभागी झाल्या आणि हा अनुभव अत्यंत चांगला होता, असे सांगितले. ‘दैनिक भास्कर’कडे तनुजा यांच्या सात पानी राजीनाम्याची एक प्रतही आहे. गुगलच्या व्यवस्थापनाने माझ्यावर एचआर चौकशी आणि दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केला, त्यामुळे मला राजीनामा देणे भाग पडले, असा आरोप तनुजा यांनी केला. निरोपाच्या पत्रात त्यांनी लिहिले,‘११ वर्षांपासून कंपनीत असल्याने माझ्याकडे नोकरी सोडण्यासाठी अनेक कारणे होती. कंपनीत जातीय समानतेला प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेत चार भारतीय महिलांना त्रास झाल्याचे दिसले. आम्हाला कार्यस्थळी जातीवर आधारित भेदभावाचा सामना करावा लागत आहे, अशी गोपनीय माहिती दोन महिला कर्मचाऱ्यांनी मला दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांत जातीय भेदभावाच्या मुद्द्याबाबतची माहिती देण्यासाठी हा टॉक शो आयोजित केला होता. दुसरीकडे, कोणत्या दबाव गटामुळे टॉक शो रद्द करावा लागला, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अमेरिकेत हिंदू राष्ट्रवाद्यांचा एक गट वेगाने पुढे येत आहे, तो भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या कार्यक्रमाचे समर्थन करतो. हा गट विद्यापीठे, आयटी कंपन्यांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सज्ज आहे. हिंदुत्वाशी संबंधित विषयांवर काही वाद झाल्यास हा गट एकत्र येतो. तो भारतात वाढत असलेल्या हिंदुत्वाच्या विचाराचे उघडपणे समर्थन करतो आणि देशासाठी तो चांगला असल्याचे मानतो. या गटाची बायडेन यांच्या नेतृत्वाखालील डेमॉक्रॅटिक पक्षात चांगली पकड आहे. अमेरिकी विद्यापीठांतील प्राध्यापकांची ‘हिंदुत्व संपवणे’ या शीर्षकाखाली एक संमेलन आयोजित करण्याची इच्छा होती, तेव्हा हा गट सक्रिय झाला होता. या संमेलनाला हार्वर्ड आणि कोलंबिया विद्यापीठासह ४० पेक्षा जास्त अव्वल विद्यापीठांनी पाठिंबा दिला होता. या गटाने विद्यापीठांना मोठ्या प्रमाणावर ई-मेल पाठवले, निदर्शने केली. अमेरिकेत संमेलनाला विरोध करण्याचे नेतृत्व हिंदू अमेरिकी फाउंडेशन आणि उत्तर अमेरिकेतील हिंदूंची आघाडी यांसारख्या गटांनी केले. त्यांनी संमेलनाचे वर्णन ‘हिंदूविरोधी’ आणि ‘हिंदूफोबियाचे बळी’ असे करत विद्यापीठांना सामूहिक ई-मेल पाठवला होता. त्यानंतर अनेक वक्त्यांनी ऑनलाइन धमक्या मिळत असल्याचा दावा करून संमेलनातून आपले नाव मागे घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...