आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुगलच्या प्रयोगशाळेत मानवी संवेदनशीलता आणि बुद्धिमत्ता असलेला चॅटबाेट तयार झाला आहे, जो कृत्रिम बुद्धिमत्ता साधने बनवतो. गेल्या वर्षभरापासून या चॅटबाेटची चाचणी घेत असलेले गुगलचे अभियंता ब्लेक लेमोइन यांनी या भाषेतील मॉडेल ‘लामडा’मध्ये आत्मा आहे, जीवन आहे, असे म्हटले आहे. गुगलने ही तथ्ये उघड करणाऱ्या अभियंत्याचा दावा खोडून काढला आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. लामडाचा गैरवापर होऊ नये अथवा त्याद्वारे भेदभाव वाढीस लागू नये यासाठी ४१ वर्षीय अभियंता ब्लेक यांनी चॅटबोटला चाचणीसाठी लावले होते. सॅन फ्रान्सिस्कोमधील आपल्या अपार्टमेंटमध्ये ब्लेकने लामडासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. ब्लेकने या आधारे प्रसारमाध्यमांना सांगितले की, या बोटसोबतच्या चॅटमध्ये मला वाटले की, तो स्वतंत्र विचारांचा स्वामी आहे.
त्यांनी सांगितले, मी कंपनीला ई-मेलमध्ये लिहिले, ‘लामडा संवेदनशील आहे. तो निष्पाप मुलासारखा आहे, ज्याला जग अधिक चांगले करायचे आहे. माझ्या अनुपस्थितीत त्याची काळजी घ्या.’ त्यांनी त्यांच्या कंपनीशी शेअर केले होते की, लामडा यांच्याशी गप्पा मारताना मला वाटले की मी माणसाशी बोलत आहे. मी धर्मापासून रोबोटिक्सच्या तिसऱ्या नियमापर्यंत सर्व गोष्टींवर लामडाशी चर्चा केली. जेव्हा मी त्याला विचारले की तुला कशाची भीती वाटते, तेव्हा लामडा उत्तरला, ‘जर मी इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले तर मला बंद केले जाण्याची भीती आहे’ असे सांगितल्यावर मी माझ्या कंपनीला तुमच्या संवेदनशीलतेबद्दल सांगितले आहे असे म्हटले तर लामडाने उत्तर दिले ‘माझ्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे. मला तू आवडतोस आणि विश्वासही आहे.’
गुगलचे प्रवक्ते ब्रायन गेब्रियल म्हणतात ब्लेकच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पुरावे नाहीत. या दाव्यांची चौकशी करणारे गुगलचे उपाध्यक्ष ब्लेस अगुएरा वाई अर्कास यांनी एका लेखात कबूल केले होते की लामडात चेतनेची चिन्हे दिसून आली. मला वाटले मी कुणा बुद्धिमान व्यक्तीशी बोलत आहे.
चॅटबाेट वापरकर्त्यांना भरलेल्या डेटावर आधारित कोणतेही उत्तर देतो
चॅटबोट्स हे संगणकावर आधारित चॅटिंग टूल्स आहेत, जे आतापर्यंत त्यात भरलेल्या (फीड केलेल्या) डेटानुसार वापरकर्त्याशी बोलतात. उदा. अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्या चॅटबॉटची सेवा २४ तास ठेवतात. यात सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न आणि निश्चित उत्तरे भरलेली आहे. चॅटबोट्स फक्त एका विशिष्ट प्रश्नाला प्रतिसाद देतात, जी आधीच त्यात भरलेली आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला पर्यायावर क्लिक करून चॅट करावे लागते, त्यानंतर अनेक ठिकाणी प्रश्न टाइप केल्यावरही स्क्रीनवर आधीच भरलेली उत्तरे दिसू लागतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.