आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परळी:गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा परळीत कोरोना रूग्णांसाठी 3 मे पासून सेवा यज्ञ, पंकजा मुंडे यांची घोषणा

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसोलेशन सेंटरची उभारणी ; बाधित महिला रूग्णांच्या घरी जेवणाचा डबा पोहचविणार

कोरोना महामारीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संकट लक्षात घेऊन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळीत कोरोना रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 'सेवा यज्ञ' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत लक्षणे नसलेल्या परंतू कोरोना पाॅझेटिव्ह असलेल्या रूग्णांसाठी विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र उभारण्याचे तसेच बाधित महिला रूग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पंकजा मुंडे व खा. डाॅ. प्रितम मुंडे या दोघीही सध्या क्वारंटाईन आहेत, असे असताना देखील त्यांनी परळी मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हर्चुअल बैठक घेऊन संवाद साधला व सध्याच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीस अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोना रूग्णांबद्दल प्रचंड सहानुभूती व सेवा करण्याचा त्यांचा उत्साह यावेळी दिसून आला.

बैठकीच्या सुरवातीला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कोरोना आजाराने नुकतेच निधन झालेले अंगरक्षक गोविंद मुंडे, कासारवाडीचे प्रभू दहिफळे तसेच ज्ञात-अज्ञात नागरिकांना याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली. गोविंदच्या निधनाबद्दल अतिशय सहानुभूती पूर्वक धीर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांनी पंकजा यांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम कोरोना काळात सर्वाना स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले. लाखो गेले तरी चालतील लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे अशी भावना काहींनी व्यक्त केल्यावर त्यांनी लाखो जगले पाहिजेत आणि पोशिंदाही, त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत असे सांगितले. येणाऱ्या काळात कोरोनाला लढा देत असताना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजसेवा करण्याचे मुर्तीमंत उदाहरण बनावे. प्रितम यांनी खासदार या नात्याने स्वतः लक्ष घालून कोविड केंद्रात जाऊन रूग्णांना धीर दिल्याचे त्या म्हणाल्या.

वैद्यनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख, जवाहर शिक्षण संस्थेचे जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅन्केचे अशोक जैन यांनी संस्थेच्या माध्यमातून रूग्णांना संपूर्ण सहकार्य करण्याचा तसेच डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. एल. डी. लोहिया, डाॅ. दिपक मुंडे, डाॅ. यशवंत देशमुख यांनीही सहकार्य करण्याचा शब्द दिला.महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे यांनी स्वतःचे वाहन उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...