आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:शाश्वत विकासात गोपीनाथ मुंडेंचे योगदान ; प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांचे मत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी शेती सहकारच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांनी मोठे योगदान दिले आहे. विकासाचा हा त्यांचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन केंद्रातील लोकनेते गोपीनाथ मंडे जयंतीनिमित्त सोमवारी त्यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. संचालक तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे अध्यक्षस्थानी होते.

मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर, महाराष्ट्र विद्यापीठ विकास मंचचे सचिव डॉ. गजानन सानप, नरहरी शिवपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सानप, डॉ. अमृतकर, शिवपुरे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा भाषणातून आढावा घेतला. मुंडेंच्या विकासाचा विचार घेऊन संस्था पुढे जात असल्याचे प्राचार्य डॉ. ठोंबरे म्हणाले. संचालक डॉ. भगवान साखळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. मिताली पवार यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा कांबळे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...