आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांना अश्रू अनावर:गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभागाकडून गौरव, कार्यक्रमात भावूक झाल्या पंकजा मुंडे

परळी(बीड)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या इन्व्हलपच्या लोकार्पणावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले.
  • गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पोस्टल इन्व्हलप जारी

भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून, भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ पोस्टल इन्व्हलप जारी केला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली आणि गोपीनाथ गडावरुन एकाच वेळी या पोस्टल इन्व्हलपचे लोकार्पण करण्यात आले. हा लोकार्पणाचा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात पार पडला.

डाक विभागाकडून इन्व्हलप जारी
डाक विभागाकडून इन्व्हलप जारी

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील वंचित, पीडित आणि उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ३ जून हा त्यांचा पुण्यस्मरण दिन दरवर्षी 'सामाजिक उत्थान' दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो. यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. मात्र कोविड महामारीची गंभीर परिस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन यंदा गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम घेण्यात आले नाहीत.

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची ऑनलाईन उपस्थिती
भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची ऑनलाईन उपस्थिती

पोस्टल इन्व्हलपचे लोकार्पण

गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप काढले असून याचे ऑनलाईन विमोचन गोपीनाथ गडावर पार पडले आहे. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत हे विमोचन झाले. कार्यक्रमाच्या ऑनलाईन लिंकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे, खा. डाॅ. भागवत कराड आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

गोपीनाथ गड येथे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी
गोपीनाथ गड येथे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी
बातम्या आणखी आहेत...