आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेळता खेळता लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक दरवाजा बंद हाेऊन १३ वर्षांच्या मुलाचा लिफ्टच्या गेटमध्ये अडकून मृत्यू झाला. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना इतकी भीषण होती की गेटमध्ये मुलाचा अर्धाअधिक गळा कापला गेला.
साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त त्याचे आई-वडील नुकतेच हैदराबादला गेले होते. त्यामुळे साकीबचा सांभाळ करण्यासाठी त्याला कटकट गेट भागातील हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे ठेवले होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना तो लिफ्टमध्ये गेला. त्यातच खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली. परंतु, दरवाजा बंद झाला अाणि बाहेर पाहताना त्याचा गळाच दरवाजात अडकला गेला. घटनेनंतर जोरात आवाज झाला. रक्ताच्या अक्षरशः धारा उडाल्या. इमारतीतील सर्व रहिवाशांनी तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांना घटना कळताच त्यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. त्यानंतर साकीबचा मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आला.
लिफ्ट जुनी असल्याने अपघाताची शक्यता
इमारत दहा वर्षे जुनी अाहे. त्यातील लिफ्टला सेन्सर नसून ती मॅन्युअल होती. परिणामी साकीबने बाहेर पाहण्याचा प्रयत्न करत असताना दरवाजा समोर आला. दोन बहिणींच्या पाठीवर साकीब हा एकुलता एक भाऊ होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.