आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांची वाहतूक, बाजारावरही बंदी:लम्पी रोगामुळे निर्णय- मंत्री विखे पाटील; आता पशूंची राज्य आणि आंतरराज्य वाहतुक करता येणार नाही

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात जनावारांच्या वाहतुकीला आतंरराज्यीय तसेच राज्याअतंर्गत बंदी घालण्यात आली आहे. तसेच राज्यातले जनावारांच्या बाजारावर देखील बंदी घालण्यात आली असल्याची माहिती महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. विभागीय आयुक्तालयात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

जनावारांसाठी लस औैषधी मोफत

विखे पाटील यांनी सांगितले की, राज्यात जनावरामध्ये लम्पी आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. लसी करणाबरोबरच सर्व औषधे उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्याना खाजगी दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही. सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच जनावरांच्या राज्य आंतरराज्यीय तसेच जि्ल्हा आणि तालुका अंतर्गत वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील जनावाराचे आठवडी बाजार देखील बंद करण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होणार आहे. यामध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे कंत्राटी स्वरुपात डॉक्टर घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या असून या खाजगी डॉक्टरांना मानधन देवून लसीकरणात सहभागी करुन घेण्याचे सांगितले आहे.

32 जनावरांचा झाला मृत्यू

विखे पाटील यांनी सांगितले की आत्तापर्यत 32 जणांचा मृत्यु झाला आहे. जनावरांच्या मृत्युनंतर दहा हजार रुपये देण्यात येणार असून वाढीव मदत देखील देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या टप्यात 17 जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पाच लाख 71 हजार जनावरांना लसीकरणाचे नियोजन असून असून पाच लाख 6800 लस उपलब्ध आहेत. तर आत्तापर्यत 2 लाख 80 हजार जनावरांचे लसीकरण झालेले आहे.

राज्यात एकुण जनावरांची संख्या 1 कोटी 96 लाख इतकी आहे. केंद्र सरकारकडून अतिरिक्त लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत पशुधन वाचवण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करणार आहे. तसेच मांस विक्रीच्या मोठ्या कारखान्यासंदर्भात नियमावलीचे उल्लंघन होत असेल तर कारवाई करु अश्या सुचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...