आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांचे अधिवेशन:सरकारी कर्मचारी संघटना जुन्या पेन्शनसाठी संपाच्या तयारीत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक भूमिका घेत आहेत. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत विविध मागण्यांसाठी केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांचे अधिवेशन झाले. त्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे, खाजगीकरण रद्द करावे यासह सात मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आंदोलनाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष देवीदास जरारे यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, जुन्या पेन्शनसाठी केंद्र, राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा विचार व्यक्त होत असून त्या दृष्टीने डिसेंबर अखेर मेळावे घेण्यात येणार आहेत. जिल्हा,तालुकापातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी सहा ते आठ महिन्यात वातावरण निर्मिती करून देशभर संपाची तयारी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...