आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोली जिल्हयात शासकिय कार्यालयांचे कामकाज ठप्प, राजपत्रित अधिकारी महासंघाच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठींबा

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

हिंगोली येथील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना चुकीची वागणुक देणाऱ्या उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी राजपत्रिक अधिकारी महासंघाने सोमवारी (ता. १५) कामबंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठींबा दिल्यामुळे सर्वच कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.

येथील निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांचे वाहन अडवून त्यांना चुकीची वागणून देण्यात आली. उपनिरीक्षक साईनाथ अलमोड यांनी प्रकरण मिटले असतांनाही सोशल मिडीयावर काही बाबी व्हायरल केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी हे अतिरिक्त दंडाधिकारी असतांनाही त्यांना उपनिरीक्षक अनमोड यांनी दिलेली वागणुक चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आज कामबंद आंदोलन करण्यात आले.

यामध्ये महासंघाचे सचिव रामदास पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, प्रविण फुलारी, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद पोहरे, आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, गणेश वाघ, नितीन दाताळ, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, गजानन शिंदे, ज्योती पवार, पांडूरंग माचेवाड, जीवककुमार कांबळे, कर्मचारी संघटनेचे तत्तापुरे, गोपाल कंठे, विनोद ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी नियोजन विभागाच्या सभागृहात एकत्र येऊन कामबंद आंदोलन सुरु केले.

या आंदोलनास तलाठी संघटना, महसुल कर्मचारी संघटना, पालिका कर्मचारी संघटना, कृषी संघटना यासह इतर संघटनांनी पाठींबा देत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे जिल्हाभरात पोलिस विभाग वगळता सर्वच विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. पोलिस विभागाने संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास आत्यावश्‍यक सेवा वगळून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर पोलिस विभागाला जिल्हा प्रशासन चालविण्यास द्यावे

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे विचार मांडले. अतिरिक्त दंडाधिकारी असलेल्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना एका उपनिरीक्षकाकडून चुकीची वागणुक दिली जात असेल तर जिल्हा प्रशासन चालविण्याची जबाबादारी पोलिस विभागाला द्यावी असे मत काही जणांनी व्यक्त केले. तर पोलिस व महसुल विभागाचे संबंध चांगले असून एका अधिकाऱ्यामुळे हा प्रकार घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
0