आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षभरापूर्वी एकुलता एक तरुण अंध मुलगा पुरात वाहून गेला. त्यानंतर डोक्यावर ११ लाखांचे कर्ज झाले. मुलाच्या मृत्यूने पत्नीही खचून गेली. त्यामुळे तणावाखाली गेलेल्या पाटबंधारे खात्यातील कर्मचाऱ्याने स्वत:च्या अंगावर चाकूने वार केले. यात अक्षरक्ष: त्यांचे आतडे बाहेर आले. पोलिसांना मात्र त्यांनी मला दोघांनी लुटल्याचे सांगितले. पोलिस १२ तास आरोपींचा शोध घेत फिरले. मात्र, तपासात या कर्मचाऱ्याने स्वत:वर वार करत लुटमारीचा बनाव रचल्याचे समोर आले.
जयप्रकाश परदेशी (५७) हे चाळीसगावच्या सब डिव्हीजनमध्ये चौकीदार आहेत. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, ‘काही दिवसांपासून आपण बनेवाडी येथे स्थायिक झालो. ७ डिसेंबरला नोकरीवर जाण्यासाठी निघाले असला १०.४५ वाजता तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांनी नगद पैसा दो, असे म्हणून जंगलात उचलून नेत पोटावर, छातीवर चाकूने वार केले. त्यानंतर माझ्याकडील ५०० रुपये घेऊन गेले.’ या घटनेत परदेशी गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर छावणीचे सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांनी तपास सुरू केला.
घटनाक्रमच संशयास्पद वाटला : छावणी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, रात्री सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले यांनी जबाब नोंदवला असता संशय निर्माण झाला. शस्त्रक्रिया बाकी असल्याने त्यांना अधिक प्रश्न विचारता आले नाही.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी गुरुवारी सकाळी पुन्हा चौकशी केली. परदेशी यांनी १०.४० ची वेळ सांगितली असताना ते सीसीटीव्हीत ११.१५ वाजता वॉकिंग प्लाझाकडे स्वत:हून जाताना दिसले. त्यामुळे उलट तपासात ते खोटे बोलत असल्याचे सिध्द झाले. कर्ज झाल्याने मीच स्वत: वार करून घेतले, अशी कबुली त्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.