आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासनाच्या हालचाली:मुख्याध्यापकांचा राजपत्रित दर्जा काढण्याच्या शासनाच्या हालचाली, ‘चौकशी करते’ असे शिक्षण मंत्र्यांचे ठेवणीतील उत्तर

हिंगोली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासनाला ही पदे अराजपत्रित का करावीशी वाटतात, हा संशोधनाचा विषय, माध्यमिक शिक्षकांतून नाराजीचा सूर

राज्यात जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधील ३५६ राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे अराजपत्रित गट क मध्ये रूपांतरीत करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची भेट घेतली असता, मी चौकशी करते, मी पाहते असे ठेवणीतील उत्तर देऊन त्यांची बोळवण केली. त्यामुळे माध्यमिक शिक्षक संघटनेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

राज्यात जिल्हा परिषदेच्या राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे असलेल्या ३५६ शाळा आहेत. यामध्ये मराठवाड्यात २९९ तर विदर्भात ५७ शाळांचा समावेश आहे. उत्कृष्ट शाळा प्रशासन व गुणवत्ता राखण्यासाठी ही पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून अनेक रिक्त पदे भरण्यात आलीच नाहीत. त्यामुळे या शाळांमधील मुख्याध्यापक पदाचा पदभार शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांवर सोपवला जात आहे.

आता शासनाने सदरील राजपत्रित मुख्याध्यापक गट ब या पदांचे रूपांतर अराजपत्रित मुख्याध्यापक गट क मध्ये रूपांतरित करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने ७ सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून सविस्तर माहिती मागवली आहे. यामध्ये राजपत्रित मुख्याध्यापक व अराजपत्रित मुख्याध्यापक यांची वेतन श्रेणी समान आहे काय, पदाचे रूपांतर झाल्यानंतर काय बदल होतील, दोघांचीही कर्तव्ये व जबाबदाऱ्या समान आहेत काय, कोणती पदे अनुज्ञेय असतात यासह इतर माहितीचा समावेश आहे.दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्यानंतर अराजपत्रित मुख्याध्यापक गट क हे पद जिल्हा परिषदेतून भरले जाणार आहे.

न्यायालयात दाद मागणार

राज्यातील राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे भरण्याचे अधिकार लोकसेवा आयोगाला आहेत. मात्र ही पदे अराजपत्रित केल्यानंतर ती जिल्हा परिषदेकडून भरली जातील. दोन्ही पदांची वेतनश्रेणी, जबाबदाऱ्या समान असताना शासनाला ही पदे अराजपत्रित का करावीशी वाटतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या विरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहे. -व्ही. पी. फुलतांबकर, राज्य अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना.

बातम्या आणखी आहेत...