आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालफितीचा कारभार:सरकारचा हलगर्जीपणा अन् तांत्रिक अडचणींमुळे 2,095 शाळांचा 6 कोटी रुपये निधी गेला परत; समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थी संख्येनुसार पाच ते पन्नास हजारांपर्यंत मिळतो निधी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या २,०९५ शाळांसाठी समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थी उपयोगी उपक्रम, शाळा स्टेशनरी आणि २०२२-२०२३ या वार्षिक खर्चासाठी सहा कोटींचे अनुदान आले होते. परंतु, पीएफएमएस या स्वयंचलित प्रणालीमुळे अनेक शाळांना हे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे हा निधी परत गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून पुन्हा निधी परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळांना निधी न मिळाल्यास शाळांनी वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, असा सवाल मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांनी उपस्थित करत निधी परत करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी संख्येनुसार मिळतो निधी समग्र शिक्षाअंतर्गत मिळणारा निधी विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येतो. २५ विद्यार्थी असतील तर पाच-दहा हजार निधी मिळतो. ५ पासून ते ५० हजारांपर्यंत हा निधी मिळतो, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...