आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल निघाले दौऱ्यावर:मी कुणाच्याही अधिकारक्षेत्रात येण्याचा प्रश्नच नाही, मी राज्यघटनेनुसार काम करतो! राष्ट्रवादीच्या टीकेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे उत्तर

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जलपुनर्भरण प्रकल्पांची पाहणी करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी. - Divya Marathi
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जलपुनर्भरण प्रकल्पांची पाहणी करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण पेटलेले असतानाच त्यांनी एका राजकीय टीकेला उत्तर दिले आहे. मी कुणाच्याही अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, मी राज्यघटनेनुसार काम करतो असे राज्यपाल म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला ते उत्तर देताना बोलत होते.

नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले, या दौऱ्यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली नाही, तर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मी कुणाच्याही अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही. कारण, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचे काम करत आहे. जितकी मदत करता येईल तेवढी राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रितरित्या केली जाणार असे आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले आहे.

भगतसिंह कोश्यारी सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांवर टीका केली होती. मुळात राज्यपालांच्या दौऱ्यातील कार्यक्रमावरच त्यांनी आक्षेप घेतला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यात दोन सत्ता केंद्रे निमार्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे मलिक म्हणाले होते. राज्यपाल उद्या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...