आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राज्यपाल गो बॅकच्या घोषणा ; काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकात आंदोलन

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी कोश्यारी यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारण्यात आले. राज्यपाल गो बॅक अशी घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शहर आणि जिल्हा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष युसूफ शेख, जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल, इक्बाल सिंग, डॉ. अरुण शिरसाठ, गुलाब पटेल, कैसर बाबा, प्रकाश वाघमारे, सागर नागरे, चक्रधर मगरे, रवी लोखंडे, बाळू गुजर, मंजू लोखंडे, स्वाती बसू, दीपाली मिसाळ, दीक्षा पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...