आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात शनिवारी एका हॉटेलच्या सभागृहात शिवप्रेमींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीचे विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधार्थ आठवडाभर निषेध सप्ताह राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात 4 डिसेंबर सकाळी 9 वाजेपासून होणार आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर सर्वप्रथम ढोल वाजून त्यांना प्रश्न विचारला जाईल व नंतर दुसऱ्या सर्व पक्षीय मंत्री व आमदारांच्या घराकडे मोर्चा आगेकुच करणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले.
महाराष्ट्रातील सर्व समाजातील 21 थोर महापुरुषांच्या बाबतीत कुणीही कोणत्याही माध्यमातून चुकीचे विधान करून नये, यासाठी कायद्यात देशद्रोहाची विशेष तरतूद करावी. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्वरीत हटवण्यात यावे, विकृत मानसिकतेला ठेचण्यासाठी ध्येय धोरण ठरविण्यासाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.
बैठकीत प्रत्येकाला दोन मिनिटे बाेलण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये राज्यपाल यांच्या चुकीच्या विधानाचा सर्वांनीच संताप व्यक्त केला. तसेच त्यांना हटवण्यासाठी निषेध सप्ताह राबवण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी मंत्री सावे यांच्या घरापासून काळ्या फिती, ढोल वाजवून आंदोलनास सुरुवात होणार आहे.
बैठकीला प्रा. चंद्रकांत भराट, बाळासाहेब थोरात, जगन्नाथ काळे, विनोद पाटील, अभिजित देशमुख, डॉ. शिवानंद भानुसे, रमेश गायकवाड, सुनील कोटकर, सचिन मिसाळ, विकीराजे पाटील, रेखा वहाटुळे, अॅड. सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले, आदी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
शहरातील सर्व पक्षीय मंत्री व आमदारांच्या घरासमोर ढोल वाजावा आंदोलन काळ्या फिती लावून रॅली काढण्यात येणार, घरावरही काळा झेंडा लावून राज्यपालांचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. राज्यपाल हटवा असे पोस्टर्स लावले जाणार आहेत. रस्त्यावर उतरून मोर्चा, निदर्शने, बंदची हाक देण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेतला जाणार, सविनय कायदेभंग केला जाणार, छत्रपती उदयनराजे यांना जाहीर पाठींबा, शेवटी राजभवनावर भव्य मोर्चा असे टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.