आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णजन्मोत्सव सोहळा:भागवत सप्ताहात दहीहंडीच्या देखाव्यासह गोविंदांचा गजर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

योगी डिव्हाइन सोसायटीतर्फे जबिंदा ग्राउंडवर सुरू असलेल्या भागवत कथेमध्ये पाचव्या दिवशी कृष्णजन्मोत्सव सोहळा झाला. या वेळी विविध कृष्णलीला दाखवण्यात आल्या. शेवटी दहीहंडीच्या उत्सवात भाविकांनी एकच जल्लोष केला. विजय प्रकाश स्वामींच्या ओघवत्या शैलीतील कथा ऐकताना भाविक तल्लीन झाले. महाराजांची ही १०० वी भागवत कथा आहे. या वेळी सभामंडपात १ हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते. माखणचोर कृष्णाच्या अद्भुत लीलांमध्ये भाविक रममाण झाले होते. मुलांनी केलेल्या प्रसंगांची तयारी अप्रतिम होती याची प्रचिती त्यांच्या भावाभिनयातून येत होती. या वेळी जय कन्हैयालाल की...चा जयजयकार झाला.

रुक्मिणी स्वयंवर
कथेच्या सहाव्या दिवशी (बुधवारी) रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग दाखवण्यात आला. चित्तथरारक स्वयंवरही तितक्याच ताकदीने कलावंतांनी सादर केले. भाविकांसाठी ही भागवत कथा अद्वितीय ठरली.

बातम्या आणखी आहेत...