आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण थिरकले:गोविंदांची लाट सुसाट..! ; दोन वर्षांनंतर तुफानी जल्लोष

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीजे लावून तुफानी जल्लोष करत शुक्रवारी सायंकाळी शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये गोविंदांची लाट उसळली. सिनेगीतांच्या ठेक्यावर हजारो तरुण-तरुणी बेधुंद होऊन नाचत असल्याचे दृश्य औरंगाबादकरांनी दोन वर्षांनंतर पाहिले. कोरोनाच्या तीन लाटांचा मागमूसही नाही, असेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचे वातावरण होते. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या उत्सवाला सिनेअभिनेत्री-अभिनेत्यांनी हजेरी लावल्याने कृष्णभक्तांचा उत्साह आेसंडला होता.

पुंडलिकनगरशिवाय बजरंग चौक, कोकणवाडी चौक, गुलमंडी, औरंगपुरा, सिडको, कनॉट, निराला बाजार आदी ठिकाणी दहीहंडी लावली होती. एखादा अपवाद वगळता सर्व पथके पाच थरांवरच थांबली होती. गजानन महाराज मंदिर परिसरातील पुंडलिकनगर रोडवरील नमो दहीहंडी महोत्सवात भवानीनगर मित्रमंडळ गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. भाजप सिडको- राजाबाजार मंडळ, भाजप गारखेडा मंडळातर्फे आयोजित या महोत्सवाला सहकारमंत्री अतुल सावे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांनी सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णपुऱ्यातील तुळजाभवानी प्रतिष्ठानने २८ सेकंदांत सलामी देत पाच थर लावले. नागेश्वरवाडीच्या शिवकल्याण, नवजीवन गोविंदा, वीर संभाजी, टेडी ग्रुप, जागृत हनुमान, सिंहराजे प्रतिष्ठान, वीर बलराम गोविंदा पथकाने पाच, तर रोहिदासपुरा गोविंदा पथकाने सहा थर लावले. भवानी मित्रमंडळाने सहा थरांची सलामी दिली.

जयभवानीनगर मित्रमंडळाने हंडी फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावले. त्यांचे उत्सव आयोजक धीरज वर्मा यांनी कौतुक केले. गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी धडकत असताना “तुला पाहते रे’ मालिकेची अभिनेत्री गायत्री दातार, “काहे दिया परदेस’ची अभिनेत्री सायली संजीव यांनी शुभेच्छा दिल्या. सलोनी शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. पदमपुरा येथे बाल गजानन गणेश मंडळातर्फे साई मंदिरासमोर आयोजित दहीहंडी महोत्सवाची सुरुवात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गजानन बारवाल यांच्या हस्ते आरतीने झाली. बजाजनगर : येथील समस्त शिवभक्त मित्र परिवार व तिसगाव येथील बिरजू भैय्या मित्र मंडळातर्फे स्वतंत्रवीर सावरकर मैदानावर आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात पाचहजार पेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थिती होती. यात आठ गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता.

पाच हजारांपासून एक लाखांपर्यंत बक्षिसांचा वर्षाव

{बजाजनगरात शिवभक्त परिवाराने प्रथम, संकल्प व महारुद्र मित्रमंडळाने अनुक्रमे दुसरा,तिसरा क्रमांक मिळवला. {गुलमंडीत सलामी देणाऱ्या प्रत्येक मंडळास विशिष्ट बक्षिसे देण्यात आली. {तापडिया नाट्यमंदिरासमोर मनसेच्या दहीहंडीत १ लाख ११ हजार १११ रुपयांचे चे बक्षीस छावणीतील जय श्रीराम गोविंदा पथकाने पटकावले. { बजरंग चौकात जय भद्रा मंडळाने १ लाख ११ हजार १११, आरबी युवा मंचाच्या दहीहंडीत श्रीगणेश पथकाने ५१ हजाराचे बक्षीस मिळवले. {कॅनॉट येथे तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे यांनीही हजेरी लावली होती. टीव्ही सेंटर येथील धर्मरक्षकच्या दहीहंडीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही नृत्य केले.

बातम्या आणखी आहेत...