आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:जि.प. इमारतीच्या निविदेत घोळ, खंडपीठाची मुख्य सचिवांना नोटीस ; 40 कोटींच्या कामात काही अटी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारत बांधकाम ठेक्यात घोळ झाला. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्यावर मुख्य सचिव, ग्रामविकास सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा प्रशासन तसेच सीबीआयला नोटिसा बजावल्या असून सात डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री, विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एन. के. कन्स्ट्रक्शन्सला ठेका मिळावा, यासाठी हस्तक्षेप केला होता, असा आरोपही त्यांनी केला.

घोडके म्हणाले की, ४० कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीचे काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने अंदाजपत्रक तयार करण्यासाठी जे. व्ही. कन्सल्टंट या खासगी कंपनीला काम देण्यात आले होते. त्यांनी केवळ एन. के. कन्स्ट्रक्शन या मंत्र्यांच्या मर्जीच्या ठेकेदाराला काम मिळणार असल्याचे माहीत असल्याने १५ ते २० टक्के जास्तीची तरतूद करून ठेवली आहे. कारण बांधकाम सभापती तसेच तत्कालीन ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांना आपल्या मर्जीतील व्यक्तींना काम द्यायचे होते. एन.के. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीकडे नियमानुसार अशा प्रकारच्या इमारतीचे काम यापूर्वी पाच वर्षात पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक होते.

ते एनकेकडे नव्हते. म्हणून या या कंपनीने मनपा घनकचरा व्यवस्थापनाचे अभियंता हेमंत कोल्हे व जी.पी. पाटे यांना हाताशी धरून घनकचरा प्रकल्प इमारतीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवले घेण्यात आले. या प्रकरणात जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी अशा अनेकांनी गैरव्यवहार केले आहेत. यात निवेदने देऊनही कारवाई झाली नसल्याने अॅड. अजय देशपांडे यांच्यामार्फत जून २०२२ मध्ये जनहित याचिका दाखल केली, असेही घोडके म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...