आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आसन व्यवस्थेचे नियोजन करताना शाळांना कसरत करावी लागली. मोठ्या शाळा वगळता शिक्षण मंडळाची तपासणी, उपकेंद्राचे नियोजन फसवे असल्याचे पहिल्याच दिवशी समोर आले. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असा दावा करणाऱ्या शिक्षण मंडळाचा दावा सरकारी शाळेतच फेल ठरल्याचे चित्र होते. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत बांधकामाचे साहित्य पडलेले, दुरुस्ती सुरू, धुळीच्या वातावरणात विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे वृत्त दै. दिव्य मराठीने शुक्रवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत माध्यमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळेतील बांधकाम साहित्य ने-आण आणि दुरुस्ती परीक्षाकाळात थांबवावी, असे आदेश सर्व मुख्याध्यापकांना पत्राद्वारे दिले आहेत.
पत्रात म्हटले की, २३ मार्चपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. परंतु, आपल्या विभागांतर्गत प्रशालेमध्ये जी काही दुरुस्ती व बांधकाम सुरू आहे, ती कामे परीक्षा संपल्यावर करावी. यासंदर्भात शाळा प्रशासनाने बांधकाम ठेकेदार ऐकत नसल्याचे पत्र शिक्षण मंडळाला दिले होते. या अनुषंगाने आता परीक्षेदरम्यान बांधकाम थांबवावे, असे पत्र जि. प. बांधकाम विभागासही दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.